कृषी पर्यटनाचा इतिहास

कृषी पर्यटनाचा इतिहास

History of agro tourism

कृषी पर्यटन ही पर्यटनातील वेगळी संकल्पना आहे. विशेषत: शेती संबंधीत ही संकल्पना असल्यामुळे भारतासारख्या अनेक शेती प्रधान देशात कृषी पर्यटनाला जास्त महत्व आहे. जगभरात पर्यटन हा व्यवसाय वेगाने वाढत आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या जगभरात वेगवेगळ्या देशात वेगवेगळी आहे. कृषी पर्यटन आर्थिक दृष्या शेतकरऱ्यांना परवडणारा व्यवसाय आहे. कृषी पर्यटनातुन गावाचा, राज्याचा आणि देशाचा विकास होत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. उदा: ऑस्ट्रेलिया, ब्राझील, न्यूझीलंड आणि युरोप इ. देश. मुळात कृषी पर्यटनाची संकल्पना/ उगम ऑस्ट्रेलिया, ब्राझील, न्यूझीलंड  या देशात झाल्याची नोंद आहे.

कृषी पर्यटन केंद्रातील सुशोभीकरणासाठी लावलेली फुले

जगभरात कृषी पर्यटनाचा उद्योग अनेक देशात उद्योग क्षेत्र म्हणून उभा राहत आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका, (संयुक्त राष्ट्रे) मलेशिया, कॅनडा, फिलिपिन्स आणि भारत इत्यादी देशाला कृषी पर्यटनाचे महत्व समजल्यामुळे व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगभर मंदी असताना मलेशिया देशाने युरोपीन देशात जाऊन कृषी पर्यटन म्हणजे काय, कृषी पर्यटनातुन मलेशिया आर्थिकदृष्या कसे सावरू शकले. याचा अभ्यास करण्यासाठी मलेशिया सरकारतर्फे अभ्यासदौरा आखली होती. कृषी पर्यटन  नवीन व्यवसाय म्हणून उदयास आलं आहे तर काही देशात येत आहेत. जगभरातील शेतकऱ्यांचा कृषी पर्यटन हे शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून चांगला जम बसत आहे. कृषी पर्यटनाची संकल्पना ही शाश्वत आणि पर्यावरणपूरक विकासावर आधारित असल्यामुळे पर्यावरणाला इतर उद्योग धंद्यासारखा कोणतेही नुकसान किंवा हानी होत नाही.

कृषी पर्यटन केंद्रातील राहण्याची व्यवस्था

देशात कृषी पर्यटन ही चळवळ सर्व प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली. पहिले कृषी पर्यटनही महाराष्ट्रातच सुरू केली गेली. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहेत. सर्वात जास्त ३५० कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात आहेत. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढतील यात काही शंका नाही. चंद्रशेखर भडसावळे यांनी कृषीविषयक शिक्षण घेऊन १९८५ साली कृषी पर्यटन केंद्राच्या धर्तीवर सगुना बागेची स्थापना केली. भातशेती शेततळ्यांमधील मत्स्यपालन, नारळ, आंबा, चिकूसारखी फळपिके आणि शेतीविषयक विविध भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली आहे. २००४ मध्ये पाढुरंग तावरे यांनी बारामती तालुक्यात पळशी कृषी पर्यटन केंद्र सुरू केले. तावरे यांनी राज्यातील विविध कृषी पर्यटन व्यावसायिकांना कृषी पर्यटन विकास संस्थेच्या माध्यमातून एकत्र आणण्यात महत्त्वाची काम केले.

शालेय विद्यार्थांना शेती आणि गाव संकृती सांगताना केंद्र, संचालक मनोज हडवळे.

पराशर कृषी पर्यटन केंद्र – राजुरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे मनोज हाडवळे या फलोत्पादन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणाने ऋषी पराशर या कृषिविषयक पहिला ग्रंथ लिहिणाऱ्या ऋषींच्या नावे हे पर्यटन केंद्र २०११ मध्ये सुरु केले आहे. तापोळा कृषी पर्यटन शेतकरी व्यावसयिक कंपनी, गणेश उत्तेकर व काही युवा प्रयोगशील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तापोळा या कोयना बॅक वॉटर असलेल्या महाबळेश्वर नजीकच्या ठिकाणी कृषी पर्यटन व्यावसायिक शेतकऱ्यांची कंपनी स्थापन केली आहे. या यासारखे वेगळे प्रयोगही महाराष्ट्रात झाले आहे.

Leave a Reply