कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास

कृषी पर्यटनातून रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकास

Employment and village Development opportunities through agri-tourism

ग्रामीण भागातील तरुणांची संख्या शहारांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बेरोजगार होय. ग्रामीण भागात कोणतेच व्यवसाय, उद्योग मोठ्या प्रमाणात नाहीत. काही छोटे मोठे व्यवसाय आहेत; पण कामगारांना योग्य पगार मिळत नाही. इतर कोणत्याही सोई सुविधा नाहीत. या महागाईच्या काळात पाच सहा हजार पगार परवडत नाही. यामुळे तरुणांचा कल शहराकडे वाढताना दिसत आहे. हे स्थलांतर थांबवायच असेल, ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होणं गरजेच आहे. आणि हे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शक्य होईल. गावाचा इतिहास, गावाविषयी माहिती असलेल्या तरुणांनी येणा-या पर्यटकांना माहिती देण्याचे काम केले, तर तो देखील एक व्यवसाय होऊ शकतो. ते गावाचा इतिहास, संस्कृती, विविध वनस्पती इ. विषयी माहिती पर्यटकांना देऊ शकतात. यातून गावाची संस्कृती जपता येईल. आणि प्रत्येक पर्यटन केंद्रांना कमीत कमी पाच जास्त्तीत जास्त शंभर लोकांना रोजगारही मिळू शकतो. गावातच रोजगार देणारे कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात आहेत. उदा: सगुणा बाग, पराशर कृषी पर्यटन, पळशी कृषी पर्यटन केंद्र, तापोळा कृषी केंद्र पर्यटन केंद्र आणि इतर पर्यटन केंद्र.

कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार मिळू शकतो.

कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी मनुष्यबळ लागते. पर्यटकांचे नियोजन, त्यांना मार्गदर्शन करणे, स्वयंपाकासाठी, शेतीकामासाठी, माळी काम, लॉड्री, ट्रेकिंग, बोटिंग, शिवार फेरी, बाजार खरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी कामगार लागतात. काही केंद्रांवर हंगामी कामगार म्हणून काम करतात. बैलगाडी, ट्रॅॅक्टर, उंट, विहरीत पोहणे यासाठी प्रशिक्षकांची गरज असते. यामुळे गावक-यांना ग्रामीण भागातच रोजगार मिळू शकतो. ग्रामीण भागात महिला पुरण पोळी, पिठलं-भाकरी आणि विविध प्रकारच्या चटण्या बनवतात. गावक-यांना या कौशल्याचा उपयोग करून मोठ्या प्रमाणत कृषी पर्यटन केंद्रामार्फत रोजगार निर्माण करू शकतो. तसेच ग्रामीण भागातील पापड, लोणचं यासारखे स्थानिक खाद्य पदार्थ तयार करून कृषी पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवता येते. स्थनिक कलाकार, हस्तकला, कलाकृती, दुर्मिळ वास्तू इ. दाखवण्यासाठीही मनुष्यबळाची गरज भासते. यातून गावात सर्व वयोगटाच्या लोकांना रोजगार नक्कीच मिळू शकते.

https://agrotourismvishwa.inagri-tourism-as-supplementary-business/

कृषी पर्यटनातून रोजगाराची संधी 

Employment generation and rural development through agro-tourism

आलेल्या पर्यटकांचे मनोरंजन करण्यासाठी लोकगीत, लोककला सादर करणे यातून रोजगार निर्मिती तर होतेच शिवाय संस्कृतीचे संरक्षण आणि संवर्धन होते. तसेच पोवाडा, भजन, कीर्तन, भारूड, लोकनृत्य, इत्यादींच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची संधी मिळू शकते. आणि यातून गावातील प्रत्येक कलेचे संवर्धनही होते. या व्यतिरिक्त प्रत्येक गावाची एक वेगळी ओळख व वैशिष्ट्य असते. नदी, ओढे, विहिरी, तलाव, धरण, शेत-तळे, इत्यादी ठिकाणी रोजगार निर्मिती होते. सुतार, कुंभार, लोहार, यांच्याकडे मिळणाऱ्या वस्तू पर्यटक खरेदी करतात. आणि जत्रा, यात्रा, उरूस, महोत्सव (आंबा, अंगूर) इ. महोत्सवात पर्यटक सहभाग नोंदवतात. यातून गावाला आर्थिक मदत होते.

काही पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी येतात. गावात, शेतात फिरतात. ग्रामीण भागात काही दुर्मिळ औषध वनस्पती, विविध रोपांची निर्मिती केली जाते. या रोपांची आणि वनस्पतींची विक्री पर्यटक करतात. या दुर्मिळ घटकांची माहिती पर्यटकांना नसते. गावात एखादी मोठी नर्सरी असेल, फळबाग असेल, प्रसिद्ध ठिकाण किंवा गूळ निर्मिती केंद्र, अशा ठिकाणी पर्यटकांना फिरायला आवडते. फिरता फिरता आजूबाजूला दिसणाऱ्या हस्तकलेच्या  वस्तूंची खरेदीही ते करतात. यामुळे गावातील व्यवसाय वाढीस मदत होते. आणि यातून गावाचा विकास होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील वस्तू शहरात जाऊन विक्री करण्यापेक्षा त्याचं वस्तू जर कृषी पर्यटन केंद्रावर विकल्या गेल्या तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत होतेच, पण गावाच्या विकासाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत होते.

https://agrotourismvishwa.inagri-tourism-in-maharashtra-2/

Leave a Reply