कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

कृषी पर्यटन केंद्रातील रोपांचे महत्त्व आणि लागवड – भाग १

Importance and Planting of Plants in Agri-Tourism Center – Part 1

अलिकडच्या काळात कृषी पर्यटन मोठ्या प्रमाणत वाढत आहे. शहरी पर्यटक आपल्या कुटुंबासह शेतशिवार बघण्यासाठी गावी अथवा ग्रामीण भागातील कृषी पर्यटन केंद्राना घेऊन जातात. शेतीमधील पिकं, शेती औजारे, शेती करण्याच्या पद्धती हे पर्यटनाचे विषय बनले आहे. याही पलीकडे म्हणजे कृषी पर्यटन केंद्रात मिळणारे सुख समाधान होय. शहरातून तीस एक किलोमीटर लांब शहराच्या बाहेर आल्यानंतर शेती सुरु होते. अशीच शेती पहिली जाते, ज्यात काही नाविन्यपूर्ण केलं आहे.

 

पूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने शेती केलेली असेल अथवा इतर कृषी पर्यटन केंद्राच्या तुलनेने वेगळे काही असेल. कृषी पर्यटन वाढवायचे असेल, तर ह्या किंवा यासरखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे अवश्यक आहे. मग सेंद्रीय शेती व शेती आधारित तसेच पर्यटनात कोणती झाडे कुठे आणि केव्हा, कोणत्या ऋतुमध्ये लावायचे म्हणजे थोडक्यात काय, तर पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, खानदेश आणि विदर्भ या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून कृषी पर्यटन केंद्रात कोणत्या रोपाचे महत्त्व काय आहे. या विषयी थोडेफार समजून घेण्याचा प्रयत्न या लेखातून केला आहे.

https://agrotourismvishwa.insuccess-story-of-parashar-agri-tourism/

झाडं आणि शेती यांचे नाते अतूट आहे. पूर्वी मानवांनी जंगल तोडून तिथे शेती योग्य जमीन बनवली. घनदाट जंगलं परिसरात जंगली प्राण्यांपासून शेतीला व माणसाला मोठा धोका होता. हा धोका पत्करून त्यांनी शेतीयोग्य जमीन मोठ्या प्रमाणात तयार केली. मात्र शेतीमध्ये असलेले झाडाचे महत्त्व ओळखून शेतीत, बांधावर काही झाडे टिकवून ठेवने, काही आवर्जून नव्याने लावणे. अलीकडे शेतीची जशी वाटनी होऊ लागली, तस तसे जमीन तुकड्यात विभागली. मोठे बांध/धुरे ही अधिकाधिक आकसू लागली. बांधावरील झाडे अनेकदा भांडणाचे कारण बनून तुटू लागली. भावकीत असलेली फळझाडे तर सर्वात आधी कटकटीचे विषय ठरून तोडली गेली. झाडाखाली पिकं उठाव धरत नाही. झाडाखालची जमीन वायालाच जाते अशा कारणांनी काही झाडे गेली. मात्र झाडे तोडतांना त्या झाडांच्या शेतीमधील वेगवेगळ्या भूमिका काय होत्या या गोष्टी आपण विसरलो.

बांधावरील झाडाशिवाय शेती पूर्ण होतच नाही. अशी शेती क्वचितच आढळेल, जिच्या बांधावर झाडे नाहीत. शेतीत गेल्यानंतर शेतकरी पहिल्यांदा शेतीत असलेल्या झाडाखाली जातो. सोबत नेलेली भाकरी, पाणी व इतर गोष्टी झाडाखाली ठेवून मगच शेतीच्या कामाला सुरुवात केली जाते.वीस-तीस वर्षापूर्वी शेतीच्या बांधावर कोणती झाडे होती? याचा नीट अभ्यास केल्यास आपल्याला लक्षात येईल की, ती शेतीमधील पिकं पाणी यांच्याशी जवळीक साधणारी होती. अलीकडे शेतीमध्ये किंवा बांधावर लावलेली झाडे ही केंद्रीकृत पद्धतीने सामाजिक वनीकरण विभागाने निवडलेली असतात. त्यामध्ये शेतशिवार व शेतकरी कुटुंब यांचा विचार केला जात नाही.

बसवंत विठाबाई बाबाराव 

प्रकल्प समन्वयक, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे

https://agrotourismvishwa.inbirds-home-at-parashar-agri-tourism-center/

Leave a Reply