जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त कृषी पर्यटन विश्वचे डिजिटल उपक्रम

Digital activities of agrio tourism world on the occasion of World Agri-Tourism Day

१६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून साजरा केले जाते. प्रत्येक दिवस साजरा करण्याचा काही तरी उद्धेश असतो. त्या दिन विशेषाचे महत्व लोकांना समजवा. या हेतूने आपण वेगवेगळे दिवस साजरा करतो. दर वर्षी १६ मे हा जागतिक कृषी पर्यटन दिवस म्हणून कृषी पर्यटन विश्वच्या वतीने दर वर्षी साजरा केली जाते. कृषी पर्यटन विश्वने डिजिटल माध्यमांचा आधार घेऊन राज्यातील शेतकरी आणि शेतीची आवड असणा-या लोकांनासाठी तसेच पर्यटकांसाठी गेली तीन वर्षापासून कृषी पर्यटन विषयी प्रचार आणि प्रसार करत आहे. कृषी पर्यटन विश्व आता चौथ्या वर्षात प्रवेश करत आहे. करोनाच्या महासंकट समयी Digital Medium चा वापर करून १६ मे या दिवसाचा औचित्य साधून अँग्रो टुरिझम विश्वने कृषी पर्यटन क्षेत्रातील तज्ञ, अनुभवी व अभ्यासू लोकांचे कृषी पर्यटनातील अनुभव एेकणे आणि पाहण्यासाठी १६, १७ आणि १८ मे रोजी आपल्या Agro Tourism Vishwa च्या पेज वरून Facebook live चे आयोजन केले आहे. घरी बसल्या या Facebook live चा मोफत अनुभव घेऊ शकता आणि ग्रामीण भागात एक शाश्वत कृषी पूरक व्यवसाय करू शकता.

१६ मे च्या या फेसबूक लाईव्ह मध्ये सकाळी ११ वाजता मनोज हाडवळे, (पराशर कृषी पर्यटन) याचं करोनंतरचे कृषी पर्यटन या अंत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. यात कृषी पर्यटन केंद्राची आणि पर्यटकांची काळजी कशी घ्यावी. करोनानंतर कृषी व ग्रामीण पर्यटनाचे स्वरूप कसे असेल? स्वच्छतेचं महत्व, कृषी पर्यटनात कोण कोणती काळजी घेणे गरजेते आहे. या विषयवार बोलणार आहेत. मनोज हाडवळे यांच्या पराशर कृषी पर्यटन केंद्राचे वेबसाईट सोबत दिले आहेत. http://hachikotourism.in/ आणि युट्यूबचे लिकं दिले आहेत. https://www.youtube.com/watch?v=Ck1VnJmbkbU

आणि संध्याकाळी ७ वाजता राहूल कुळकर्णी (आनंदाचं शेत कृषी पर्यटन) याचे कृषी पर्यटनाच्या अलीकडे आणि पलीकडे वर बोलणार आहेत. म्हणजे आपला कृषी पर्यटन प्रकल्प शाश्वत म्हणजे चिरकाल टिकावा, बहरावा यासाठी अलीकडे: पर्यटक येण्यासाठी, आल्यावर आपण काय काय करावं जे आपल्याच प्रकल्पाच्या आणि त्याच्याशी निगडित परिसंस्थेच्या पायावर कोणतीही कुऱ्हाड मारणारं नसेल, आणि पलीकडे: म्हणजे पर्यटक येऊन गेल्यानंतरही आपल्या पर्यटन प्रकल्पाच, यु एस पी म्हणजे वेगळेपण, त्याचं परिसराशी, निसर्गाशी, गावाशी, पर्यावरणाशी असलेलं नातं टिकून रहावं किंवा अजून चांगलं होण्यासाठी काय करावं, शाश्वत कृषी पर्यटनासाठी काय आणि कशी काळजी घ्यावी या अशा महत्वाच्या आणि गरजेच्या विषयावर Agro Tourism Vishwa च्या पेजवरून बोलणार आहेत. राहूल कुळकर्णी यांच्या विषयी अधिक माहितीसाठी त्यांच्या कृषी पर्यटनाचे वेबसाईट आणि युट्यूबचे लिंक सोबत दिले आहे. http://www.farmofhappiness.com,  https://youtu.be/NEcg2ZbU0vE .

१७ मे रोजी सकाळी ११ वाजता MTDC चे प्रादेशिक व्यवस्थापक मा. दिपक हरणे हे MTDC आणि कृषी पर्यटन या विषयावर बोलणार आहेत. कृषी पर्यटनासाठी MTDC चे कोणते सवलती/ उपक्रम/ योजना आहेत. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि महाराष्ट्रातील कृषी पर्यटन यांच सांगड कसा घातला आहे? कृषी पर्यटना बद्दल  MTDC ची भूमिका काय आहे? एकंदरीत MTDC चे सहकार्य कसा आहे यावर मा. हरणे बोलणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी ६ वाजता कृषी पर्यटनाचे अनुभव असलेले अभ्यासक गणेश उत्तेकर, कृषी पर्यटन आणि प्रादेशिक पर्यटनाचे महत्व फेसबूकच्या माध्यमातून सांगणार आहे.

१८ मे या दिवशी सकाळी ११ वाजता कृषी पर्यटन आणि भविष्य या विषयावर गणेश चप्पलवार (कृषी पर्यटन विश्व) बोलणार आहेत आणि याच फेसबूक लाईव्ह मध्ये Agro Tourism Vishwa चे नविन अर्थपूर्ण लोगोचा लाँच ( We are launching the new logo of Agri Tourism Vishwa) आपल्या सर्वांच्या साक्षीने करणार आहेत. गणेश चप्पलवार यांच्या विषयी अधिक माहितीसाठी लिंकवर दिलेल्या क्लिक करा. https://agrotourismvishwa.inabout-us-page/

संध्याकाळी ६ वाजता पर्यटन विश्वचे कार्य आणि भूमिका या वर पवन घटकांबळे बोलणार आहेत. कृषी पर्यटन विश्वची सुरूवात का? कधी? आणि कोणासाठी सुरूवात झाली. नेमंक आम्ही कृषी पर्यटन विश्व काय करते? आमची सेवा काय आहे. अनुभवी टीम विषयी, या डिजिटल युगात कृषी पर्यटनात काय बदल झाले पाहिजेत या बद्दल पवन बोलणार आहेत.

4 Comments

Leave a Reply