जलविश्व ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प

जलविश्व ॲग्रो टुरिझमअँड रिव्हर कॅम्प, तापोळा

Jal Vishwa Agro and River camp tourism

      महाबळेश्वरजवळचं ‘मिनी काश्मीर’ अशी तापोळा गावची ओळख आहे. एका बाजूला मोठमोठे डोंगर, दुसऱ्या बाजूला कोयनेचा विस्तीर्ण जलायशय आणि आजूबाजूला हिरवीगार गर्द झाडी असा निसर्गसंपन्न परिसराचा वारसा तापोळा या गावाला लाभलेला आहे. केवळ 600 लोकसंख्या असलेल्या या गावात आजमितीला जवळपास 15-16 कृषी पर्यटन केंद्र आहेत. यातील ‘जलविश्व ॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प’ हे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे.  

जलविश्व कृषी पर्यटन दृश्य

जलविश्व कृषी पर्यटन केंद्राविषयी –

about jal vishwa agro tourism

जलविश्वॲग्रो टुरिझम अँड रिव्हर कॅम्प या नावातच पर्यटन केंद्राचे  पूर्ण वैशिष्ट्य दडलेलं आहे. कारण हे केंद्र कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाच्या  किनाऱ्यावर वसलेले आहे. केंद्राचा परिसर व आजूबाजूचे वातावरण अतिशय रम्य व प्रसन्न आहे. एका बाजूला उंच डोंगर आणि समोरचं निळेशार कोयनेचं पाणी आणि मध्ये असणाऱ्या छोट्याशा लोकवस्तीत हे केंद्र आहे. उंच सखल जमिन व जलाशयाच्या किनाऱ्याचा  पुरेपुर वापर करत निसर्गसंपन्न पर्यटन केंद्र बनवले आहे. केंद्राची रचना व बांधकाम आधुनिक पद्धतीचे आहे.

बोटिंग आणि ट्रेकिंगसाठी उत्तम पर्याय

केंद्राचे वैशिष्ट्ये  (Features of Jal Vishwa Agro and River camp tourism)

या केंद्रात कृषी पर्यटनाबरोबरच जलपर्यटनाचा आनंदही लुटता येतो. तसेच या ठिकाणी फोटोग्राफीसाठीही वेगवेगळे स्पॉट आहेत. पर्यटकांना हॉलीबॉल,  निशाणेबाजी, कॅरम, टेनिस यांसारख्य खेळांचा आनंद घेता यावा म्हणून सोयी केंद्रचालकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

तुमच्या खोलीमधून कोयना धरणाचे नयनरम्य दृश्य फक्त आमच्याकडे अनुभवा

राहण्याची व्यवस्था – (Accommodation in Jal Vishwa Agro and River camp tourism)

पर्यटकांची गरज लक्षात घेऊन या पर्यटन केंद्राचे बांधकाम करण्यात आपले आहे. फॅमिली, कपल, ग्रुपसाठी सर्व सोयींनी युक्त  रूम बनवण्यात आल्या आहेत. लहानमोठ्या मिळून जवळपास 7 रूममध्ये पर्यटकांची राहण्याची व्यवस्था करण्यात येते.  

भोजन व्यवस्था – (Meal arrangements in Jal Vishwa Agro and River camp tourism)

सकाळी नाष्ट्यामध्ये पर्यटकांना पोहे मिसळ , चहा-कॉफी, आमलेट यांसारखे पदार्थ दिले जातात. तसेच जेवणामध्ये थाळी सिस्टीम आहे.  पर्यटकांच्या आवडीनुसार जेवण दिले जाते. मात्र पर्यटकांना स्थानिक जेवण द्यावे याकडे केंद्रचालकांचा भर असतो. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांसाठी जलाशयातील ताजे मासे आणून बनवून दिले जातात. त्याचबरोबर तांदुळाची बाजरीची भाकरी दिली जाते.

सुसज्य खोलीत आणि परिसरात राहण्याचा अनुभव घ्या.

पर्यटन केंद्रांचे उपक्रम – (Tourism Center Activities)

पर्यटन केंद्राच्या आजूबाजूला वासोटा किल्ला, दत्तमंदिर, नद्यांचा त्रिवेणी संगम, कोयना अभयारण्य , कास पठार यांसारखी पर्यटन ठिकाणे  आहेत. पर्यटकांच्या मागणीनुसार त्यांना या ठिकाणांची सफर घडवली जाते. हौशी ट्रेकर्सना वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी ट्रेकिंगचे आयोजन केले जाते.
परिसरात आजूबाजूला स्ट्रॉबेरीची शेती आहे. स्ट्रॉबेरीच्या शेतात नेऊन  याविषयी माहिती पर्यटकांना दिली जाते.
केंद्राला लागूनच कोयनेचा जलाशय असल्यामुळे पर्यटकांना जलक्रीडा पर्यटनाचा अनुभव घेता येतो. यामध्ये साहसी खेळ खेळता येतात पर्यटकांसाठी मोटर बोट, स्पीड बोटची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. या बोटींच्या माध्यमातून दत्त मंदिर, त्रिवेणी संगम, वासोटाफोर्ट या जवळच्या पर्यटन केंद्राला भेट देता येते. तसेच जवळच कोयना व साळवी नदीच्या संगमावर शिवसागर बोट क्लब नावाचा बोट क्लब स्थापन करण्यात आलेला आहे यामध्ये मोटर बोट, स्पीड बोट, स्कूटर बोट यांसारख्या विविध प्रकारच्या बोटी आहेत. त्यांच्या माध्यमातून पर्यटक जलसफरीचा आनंद लुटतात. निवांतपणाचे क्षण अनुभवण्यासाठी व जलक्रीडेचा आनंद घेण्यासाठी या केंद्राला  आवश्य भेट द्या .

स्पेशल रूम

 

article by

Supriya Thorat. 

Leave a Reply