कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?

 Who and how start agri – rural and farm tourism.?

कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?

आजकाल लोक पर्यटनाबाबत खूपच जागरूक होत आहेत. लोकांना पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकार खुणावत असतात. याच गोष्टीचा फायदा ग्रामीण पर्यटनाने उचलला पाहिजे. कारण आजही शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यटन उपेक्षितच आहे. ग्रामीण पर्यटनाचा हवा तेवढा  प्रचार व प्रसार झालेला नाही. ग्रामीण पर्यटनाला वाव देण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. शेती , गाव , शेतकरी,पर्यटक , परिसराचा इतिहास व भूगोल , पर्यावरण हे कृषी पर्यटनासाठी आवश्यक असणारे महत्वाचे घटक आहेत. कोरोनामुळे अनेक लोक गावी गेले आहेत. गावाकडेही आर्थिक स्रोतांवर मर्यादा आहेत. केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याला जोडधंदा म्हणून जर कृषी पर्यटन केंद्र सुरु केले तर आपल्याबरोबरच इतर स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

कृषी पर्यटन केंद्रातील हिरवळ

 
कृषी पर्यटनाच्या निमित्ताने शहरी लोकांना ग्रामीण संस्कृती माहिती होते , धकाधकीच्या जीवनातून चार क्षण विश्रांतीचे आणि शांतीचे मिळतात. तर शेतकऱ्यालाही या पाहुणचाराच्या बदल्यात योग्य मोबदला मिळू शकतो. कृषी पर्यटनातून स्थानिक पर्यटनाचा नक्कीच विकास होतो. स्वतःची शेती असणारा शेतकरी किंवा चार-पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊनही सामुदायिक प्रकल्प म्हणून कृषी पर्यटनाचा व्यवसाय विकसित करता येऊ शकतो. याशिवाय अजून काही संस्था कृषी पर्यटन व्यवसाय सुरु करू शकतात. जाणून घ्या कृषी पर्यटन व्यवसाय कोण कोण सुरु करू शकतो.
 
https://agrotourismvishwa.inagri-tourism-and-challenges-opportunities/
 
राज्यातील शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय आणि नागरिकांना पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी राज्यात कृषी पर्यटन धाेरण राबवण्यास सप्टेंबर २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार शेतकरी, शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या , सेंद्रिय शेती करणारा शेतकरी कृषी पर्यटन केंद्र उभारू शकतात.
 
शेतकरी कृषी पर्यटन केंद्र : (Farmer Can Start Agri Tourism Center)

स्वतःची जमीन असणारा शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो. शेतकरी पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती शेती करणारी असावी.  तसेच ही शेती त्याच्या स्वत:च्या अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे आवश्यक आहे. अगदी एक एकर जागेतही कृषी पर्यटन उभारता येते. याशिवाय चार-पाच शेतकरी एकत्र येऊनही सामुहिक कृषी पर्यटन उभारता येऊ शकते. कृषी क्षेत्र कमी आकाराचे असल्यास आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कृषी संबंधित बाबी संबंधित शेतकऱ्याच्या सहमतीने पर्यटकांना दाखविता येतील. 

शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था : (Agricultural Cooperative Society)

सहकाराचा सर्वात जास्त विस्तार कृषी क्षेत्रात झाला आहे. कृषी सहकारी संस्था देखील कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतात. कृषी सहकारी संस्थामार्फत  व्यावसायिक तत्वावर कृषी पर्यटन केंद्र सामुदायिकपणे सुरु करता येऊ शकते.

राज्यातील कृषी विज्ञान केंद्र कृषी पर्यटन सुरू करू शकतात. (KVK Can be a Great Agri-Tourism hub)

प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे एक किंवा त्यापेक्षा अधिक कृषी विज्ञान केंद्रे असतात. कृषी विज्ञान केंद्रांद्वारे शेतकरी व कृषी उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते. कृषी विज्ञान केंद्र एक उपक्रम म्हणून कृषी पर्यटन विकसित करू शकते.

कृषी महाविद्यालये/ कृषी विद्यापीठे : (Agricultural Colleges / Agricultural Universities)

प्रत्येक कृषी महाविद्यलयाला स्वतःची जमीन किंवा मोठा कॅम्पस असतो. कृषी महाविद्यालये/ कृषी विद्यापीठे एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून कृषी पर्यटन केंद्र विकसित करू  शकतात. या प्रकल्पामध्येमध्ये ते विद्यार्थ्यांनाही सामील करून घेऊ शकतात.
 
शेतकऱ्यांच्या भागीदारी संस्था : (Farmers Partnership Institutions Can be Start Good Agro Tourism Centre)
 
शेतकऱ्यांनी स्थापन केलेली भागीदारी संस्था किंवा कंपनी कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकते. शेतीमाल विकण्यासाठी किंवा शेतीतून उत्पादने तयार करण्यासाठी शेतकरी भागीदारी संस्था किंवा कंपनी स्थापन करतात.  शेतकरी भागीदारी संस्था किंवा कंपनीने कृषी पर्यटन केंद्र सुरु केल्यास त्यांच्या मूळ व्यवसायालाही अधिक प्रमाणात चलन भेटेल.

सेंद्रिय शेती करणारा शेतकरी : (Organic Farming Farmer Should be Start Agro Tourism Center )

रायासनिक शेतीमुळे लोकांच्या आरोग्यावर आणि शेतीवरही विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता वाढत आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरणात सेंद्रिय शेती करणारा शेतकरी देखील कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो याला मान्यता देण्यात आली आहे.

कोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी : (Agricultural Business)

केवळ शेती करणारच नाहीतर कोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी देखील  कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो. जेणेकरून पर्यटकांना केवळ शेतीच नाहीतर शेतीपूरक व्यवसायांची देखील ओळख व्हावी.याशिवाय  उत्साही व्यक्ती, आवड असणारा, गावावर प्रेम करणारा, गावाचा इतिहास, भूगोल, पर्यायवरण आणि पर्यटनाविषयी जाण असणारा व्यक्ती कृषी व ग्रामीण पर्यटन करू शकतो.

https://agrotourismvishwa.inrural-agro-tourism-and-holiday/

 

कृषी पर्यटन केंद्राचा परिसर

कृषी पर्यटन केंद्र कसे विकसित करावे – (How to Develop Agro-Tourism Center)

 कृषी पर्यटन केंद्रचालक टप्याटप्याने काम करत कृषी पर्यटन केंद्र विकसित करू शकतो.

१) शेतीचे / जमीन सपाटीकरण करणे : (Leveling the Land is the First Step of Agri Tourism Center )

कृषी पर्यटन केंद्र अगदी उंच-सखल जागेमध्ये  सपाटीकरण करून सुरु करता येते. केंद्रासाठी निवडलेली जागा जर उंच-सखल असेल तर सर्वात आधी जमिनीचे सपाटीकरण करावे. जमिनीचे सपाटीकरण झाल्यानंतर त्यामध्ये झाडे लागवड , बांधकाम सुरु करावे.

https://agrotourismvishwa.inanniversary-of-parashar-agri-tourism/

२) देशी झाडं लावणे : (Planting of Desi Trees in Agro Tourism)

ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे, हा कृषी पर्यटनाचा उद्देश आहे. त्यासाठी जमीन उपयोगाखाली आणण्यासाठी विविध प्रकारची झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती , फुलझाडे , पिके , रानभाज्या , फळझाडे , मोठे वृक्ष असे वर्गीकरण करून झाडे लावू शकता. तसेच पर्यटन केंद्राच्या ठिकाणी एकाच वेळी विविध पीक पध्दतींचा अवलंब  करावा जेणेकरून पर्यटकांना शेतीतील विविधतेचा अनुभव घेता येईल.

३) कृषी पर्यटन केंद्राची सिमारेषा आखून घेणे : (To Draw the Boundaries of Agri-Tourism Center)

कृषी पर्यटन हे शेती आणि शेती संलग्न बाबींवर आधारित असल्यामुळे कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी कमीत कमी 1 एकर किंवा त्यापेक्षा जास्त शेती क्षेत्र असावे. यातून आपल्याला नियोजन करता येते आणि खोली, स्वयंपाकघर, हाँल, पार्किंग, संग्रहालय, माहितीचे दालन इ. नियजोन करू शकता.
 
४) डे-टुरिझम करणे : (Day-Tourism)

विशेषतः शालेय विद्यार्थ्यांसाठी डे टुरिझम म्हणजेच एक दिवसीय सहल आयोजित करता येईल. शहराच्या 50-60 कि.मी अंतरावर असलेल्या कृषी पर्यटन केंद्रावर एका दिवसात आपण जाऊन येवू शकतो. सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अनेक उपक्रम करू शकतो. शेत शिवार, गाव दर्शन, जेवण, ट्रेकिंगसह इतर गोष्टी करू शकतो. जवळच्या कृषी पर्यटन असेल तर डे टुरिझम करू शकतो.
https://agrotourismvishwa.inimportant-of-elements-of-agri-tourism/
 
५) स्टे -टुरिझम म्हणजे राहण्याची व्यवस्था करणे : (Stay Tourism in Agri Tourism)

कृषी पर्यटन केंद्र हे शांत, सुंदर, निसर्गरम्य अशा ठिकाणी असावे. कृषी पर्यटन केंद्रांतर्गत राहण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या खोल्या शक्यतो पर्यावरणपूरक असाव्यात. खोली, रूम्स् आणि टेन्ट अशा स्वरूपात स्टे टुरिझमला सुरुवात करू शकतो.

६) पर्यटकांसाठी वेगवेगळे उपक्रम घेणे : (Taking various activities for tourists in Rural and Agri Tourism)

 बैलगाडी , घोडेस्वारी , ट्रॅक्टरवरून फेरी , शिवारफेरी यांसारखे उपक्रम राबवावेत. पर्यटन केंद्रावर ग्रामीण व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था करावी. पर्यटन केंद्रावर ग्रामीण खेळांची माहिती द्यावे ते खेळण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावीत. उदा. विटीदांडू, हूतूतू, लंगडी, झोका, लगोरी.
पर्यटन केंद्रावर ग्रामीण लोक व पारंपारिक मनोरंजन कार्यक्रमाची व्यवस्था करावी.  
उदा. लेझिम, भजन, किर्तन, आदिवासी नृत्य ,पोवाडा , जागरण गोंधळ .
 
७) शेती कामांचा अनुभव देणे : (Giving experience of agricultural work via Agri Tourism)
 
ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्यासाठी शेतीवरील विविध हंगामातील कामे दाखविण्याची सोय असावी. तसेच पर्यटकांना देखील प्रत्यक्ष कामाचा अनुभव द्यावा. भातलावणी, पिकांची तोडणी, रास इत्यादी शेतीचा प्रत्यक्ष अनुभव देऊ शकतो. यातून पर्यटकांना शेती काम, शेतकरी तसेच गावाविषयी आदर निर्माण होईल आणि शहर व गावाची दरी कमी होण्यास मदत होईल.
https://agrotourismvishwa.inblog-about-agri-tourism-vishwa-team/

८) सुरूवातीला समाज माध्यमांचा वापर करून मार्केटिंग करणे : (Agro Tourism Marketing using social media)

सध्याचे युग डिजिटल युग आहे. त्यामुळे कृषी पर्यटन केंद्राचा प्रचार आणि प्रसार समाज माध्यमांद्वारे करावा. सुरूवात समाज माध्यमातून मार्किटिंगला सुरूवात करावे.
उदा. लिंकडंइन, फेसबुक, युट्युब आणि इंस्टाग्राम इ.
 
९) परिसरातील पर्यटन आपल्या कृषी पर्यटनात सामावून घेणे : (Incorporating local tourism into your agri-tourism)
 
पर्यटन केंद्राच्या परिसरात  इतरही पर्यटन ठिकाणे  असल्यास त्याबाबत केंद्रचालकाने पर्यटकांना मार्गदर्शन करावे. गावाची जत्रा, यात्रा, पर्यटन ठिकण, ऐतिहासीक स्थळ व प्रसिध्द ठिकाणांची ही आपल्या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जोडून घेऊन काम कऱणे.
उदा. जुन्नर पर्यटन विकास संस्था
 
१०) आलेल्या पर्यकांना आपले शेती उत्पादनं विकणे : (Selling your agricultural products to the visitors)

कृषी पर्यटन केंद्राने शेतीमधील ताजा भाजीपाला, फळे, अन्नधान्य, महिला बचत गटाचे उत्पादने, पापड, लोणचं इ. माल पर्यटकांना विक्रीसाठी उपलब्ध करुन द्यावा. या आणि अशा अनेक टप्यटप्याने कृषी पर्यटन केंद्राचा विकास आपण करू शकतो.

Leave a Reply