कृषी व ग्रामीण पर्यटनाचे फायदे

कृषी पर्यटनाचे फायदे  Benefits of agro tourism

 ‘कृषी आणि पर्यटन’ या दोन गोष्टींच्या समन्वयातून बनलेली कृषी पर्यटन ही पर्यटनाची नवीन संकल्पना सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे.  ग्रामीण भागातील शेती, निसर्ग, पशु-पक्षी, संस्कृती आणि जीवनशैली याचे शहरी भागातील लोकांना आकर्षण वाटू लागले आहे. त्यामुळे विरंगुळा किंवा क्षणभर विश्रांती म्हणून शहरी लोक आता ग्रामीण भागाकडे पर्यटन केंद्र म्हणून पाहू लागले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी पर्यटन व्यवसायाला चालना भेटत आहे. महाराष्ट्रात आजमितीला जवळपास ७०० ते ७५० प्रयत्न केंद्रे आहेत. कमीतकमी एक एकर जागेमध्येही कृषी प्रयत्न केंद्र सुरु करता येते. कृषी पर्यटन केंद्र वै शेतकरी, कृषी सहकार संस्था, शेतकर्यांषची सहकारी संस्था, अशासकीय संस्था, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठे, शेतकर्यांकनी एकत्र येऊन तयार केलेल्या भागीदारी संस्था किंवा कंपन्या, ग्रामपंचायत, शेतकऱ्यांचे गट यांपैकी कुणीही सुरु करू शकतो. शेतीतून अधिक उत्पन्न मिळवायचं असेल तर केवळ शेती पिकांवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय सुरु केले पाहिजेत. कृषी पर्यटन हा त्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

कृषी पर्यटन केंद्रात भात लावणीचा अनुभव घेताना पर्यटक

कृषी पर्यटन हा पर्यावरणपूरक व्यवसाय आहे. Agri-tourism is an environmentally friendly business

कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकसातून राज्याचा विकास साधता येईल. कृषी आणि पर्यटन या दोन विभागांच्या समन्वयाने शेतकरी आपली आर्थिक प्रगती करू शकेल. शेतातील जागेतच केंद्र उभारता येत असल्यामुळे नवीन जागा शोधण्याची गरज पडत नाही. यासाठी ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनीचा योग्य वापर होऊ शकतो.

 https://agrotourismvishwa.inagri-tourism-and-challenges-opportunities/

कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांसाठी स्थानिक बाजारपेठ व इतर रोजगाराची संधी उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक उत्पन्न तर वाढेलच शिवाय ग्रामीण व स्थानिक रोजगारामध्ये वाढ होईल. आपण पिकवलेल्या शेतमालाची किंमत स्वतः शेतकऱ्यांना ठरवता येईल. शेती भोवताली असणाऱ्या गोष्टींतूनच स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळतील. पर्यटन केंद्रासाठी मनुष्यबळ आवश्यक असते.  पर्यटकांचे नियोजन. मार्गदर्शन, स्वयंपाकासाठी, शेतीकामासाठी, माळी काम, लॉड्री, ट्रेकिंग, बोटिंग, शिवार फेरी, बाजार खरेदी, ऑनलाईन मार्केटिग, जाहिराती, व्यवस्थापनासाठी मोठ्या प्रमाणत कामगार लागतात. यातून शेतकऱ्यांसह गावातील युवकांना गावपातळीवर रोजगार मिळेल.

निसर्गाच्या सानिध्यात रमलेले पर्यटक

कृषी पर्यटनाचे फायदे : (Benefits of agro tourism)

कृषी पर्यटनाच्या माध्यमातून कृषी उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळेल. परिसरातील लघुउद्योग-कुटिरोद्योगास चालना मिळेल. अशाप्रकारे कृषी पर्यटनातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. समजा गावात एखादी मोठी नर्सरी असेल, फळबाग असेल, प्रसिद्ध ठिकाण असेल अशा ठिकाणी पर्यटकांना फिरण्यासाठी नेल्यास ते त्याठिकाणहून वस्तू खरेदी करू शकतात. यामुळे ग्रामीण भागाचा व्यवसाय वाढते. यातून गावाचा विकास होण्यास मदत होते. ग्रामीण भागातील वस्तू शहरात जाऊन विक्री करण्यापेक्षा तीच वस्तू जर कृषी पर्यटन केंद्रावर किफायतशीर किमतीत मिळत असेल तर यातून पर्यटकांचीही आर्थिक बचत होईल तसेच शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळेल.

https://agrotourismvishwa.inthe-difference-between-agri-tourism-and-resort/

कृषी पर्यटन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणत वाढत आहे.  The business of agri-tourism is booming.

गावातील काही महिलांचा बचत गट असेल तर त्यांची उत्पादने पापड , लोणचे किंवा विविध कलाकृती पर्यटन केंद्रावर विक्रीसाठी ठेवल्यास महिलांना त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो. याशिवाय गावातील स्थानिक लोकांच्या कलाकृती बांबूचे टोपले, सूप , नीरा मध यांसारखे खाद्यपदार्थ यांचीही विक्री पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होते. यामुळे ग्रामीण भागातील लोककला, हस्तकला, खाद्य संस्कृती शहरी भागापर्यंत पोचायला मदत होते आणि गावाची लोककला, खाद्यसंस्कृती, यात्रा उत्सव, परिसरातील पर्यटन वैभव यांचे जतन व संवर्धन होते.

शालेय विद्यार्थांना शेती आणि गाव संकृती सांगताना केंद्र, संचालक मनोज हडवळे

कृषी पर्यटनाच्या माध्यामातून ग्रामीण व शहरी भागांच्या माहितीची, ज्ञानाची देवाण-घेवाण होते. शहरी पर्यटकांना शेती व शेतीविषयक कामांची माहिती आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी कृषी पर्यटन हा उत्तम पर्याय आहे. ग्रामीण जीवनाचा, संस्कृतीचा, लोककलांचा, खाद्य संस्कृतीचा त्यांना अनुभव पर्यटकांना घेता येतो. कुटुंबासोबत निवांत क्षण घालवण्याची उत्तम संधी पर्यटकांना मिळते. शहरी लोकांना शेतीत किती कष्ट करावे लागतात याची कल्पना येईल. शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी होण्यास मदत होईल. ग्रामीण लोकांचाही शहरी आधुनिकतेशी संपर्क येईल. कृषी पर्यटन केंद्रामुळे गावाचीही प्रसिद्धी होईल. तसेच ग्रामीण भागातील राहणीमान उंचावू शकेल. 

https://agrotourismvishwa.inagro-tourism-is-integrated-project/

कृषी पर्यटन केंद्रात शेकोटी भोवती गप्पा मारताना पर्यटक

ग्रामीण संस्कृती, परंपरा, कलाकृती लोप पावत चालल्या आहे. जुनी गाणी, कथा, संस्कृती, परंपरा नष्ट हे सर्व कृषी पर्यटनाच्या माध्यमातून जतन करता येईल. . पूर्वीची कौलारू घरे, घर शेणाने सावरणे, घरची रचना, अंगण तसेच वेशभूषा, केशभूषा, पारंपरिक पेहराव, राहणीमान, बोलीभाषा, चित्रकला इ. चे जतन आणि संवर्धन पर्यटन केंद्राच्या माध्यमातून होत आहे. शहरी भागातील पर्यटक मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात येतात. त्यांना ग्रामीण संस्कृतचे विशेष आकर्षण असते. कृषी पर्यटनातून लोक ग्रामीण जीवन पाहतात, अनुभवतात आणि जगतात. यातूनच आपल्या ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन होते. ग्रामीण भागात काही दुर्मिळ औषध वनस्पती असतात त्यांचे कृषी पर्यटन केंद्रात संवर्धन केले जाऊ शकते.

कृषी पर्यटनाचे पर्यटकांना होणारे फायदे (Benefits of agro tourism)

पर्यटकांना प्रदूषणमुक्त आणि गावच्या वातावरणाच्या सानिध्यात राहायला मिळते.

विद्यर्थ्यांच्या सहली केंद्रावर आयोजित करण्यात येतात. विद्यर्थ्यांना निसर्गाचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

पर्यटकांसाठी आयोजित केलेल्या लोककलांच्या कार्यक्रमांमुळे या लोककला पर्यटकांना जवळून पाहता येतात.

पर्यटकांना आरोग्यदायी वातावरणात राहायला मिळते. केंद्रामध्ये पर्यटकांना गावरान पद्धतीचे जेवण दिले जाते. या जेवणासाठी लागणारा भाजीपाला हा शेतातच पिकवलेला असतो. अशाप्रकारे पर्यटकांना केंद्रात आरोग्यदायी आहार-विहार मिळतो.

कृषी पर्यटन केंद्रावर जेष्ठ नागरिक, महिला मंडळ यांच्या सहलीही आयोजित करता येतात. यामुळे जेष्ठ नागरिक, महिला मंडळालाही आपल्या बरोबरीच्या लोकांसोबत सहलीचा आनंद लुटला येईल.

पर्यटन केंद्रामध्ये ऑफिसच्या कॉर्पोरेट मीटिंग देखील आयोजित करता येतील. यामुळे कामाबरोबरच पर्यटनही होईल आणि कामाचा ताणही जाणवणार नाही.

अशाप्रकारे कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शहरी लोकांना ग्रामीण जीवन , संस्कृती , शेती आणि निसर्ग यांच्याशी जोडण्याची संधी कृषी पर्यटनामुळे मिळत आहे. तर ग्रामीण भागातील लोकांना गावातच रोजगाराच्या आणि आर्थिक उत्पन्न वाढवण्याच्या संधी कृषी पर्यटनातून मिळत आहेत. 

4 Comments

Leave a Reply