कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

कृषी पर्यटनातुन ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन-भाग १

Protection / promotion of rural culture through agri-tourism-Part 1

अतिथी देवो भव: ही आपली भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अनुबंध कृषिप्रधान भारताशी आहे. भारतीय संस्कृती ही मुख्यत: ग्रामीण भागाशी निगडित असल्याने प्रत्येकालाच आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओढ असते. शहरातील धकाधकीच्या जीवनात कंटाळलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद घेण्यासाठी निवांतपणे निसर्ग सान्निध्यात जावेसे वाटते म्हणून ‘कृषी पर्यटन’ हा अलीकडे झपाट्याने विकसित झालेल्या पर्यटनाचा प्रकार आहे.

कृषी पर्यटन केंद्रात जतन केलेल्या ग्रामीण वस्तू.

‘गाव आणि गावपण’ हरवत चाललंय असे आपण म्हणतो. गाव तसेच शहरी लोकांच्या मनात ही सल आहे. आजही खेड्याची ओढ असलेले शहरी भागातले काही लोक आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाते टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा लोकांना ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देण्याचं आणि ती “याची देही , याची डोळा” अनुभवण्याची संधी कृषी पर्यटन केंद्र उपलब्ध करून देत आहेत. या निमित्ताने एकप्रकारे कृषी पर्यटन केंद्रातून ग्रामीण संस्कृतीचे संरक्षण / संवर्धन होत आहे . ग्रामीण भागाची नाळ तुटलेल्या पर्यटकांना गावाकडे जाऊन निवांत राहण्याची संधी आणि शेतकऱ्यांनाही जोडधंदा मिळावा, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीची ती ओळखही बनली. मुळातच कृषी पर्यटन म्हणजे गावची संस्कृती, रीतीभाती, शेतशिवाराची ओळख. परंतु अलीकडे जागतिकीकरणामुळे ग्रामीण भागावरही शहरी संस्कृतीचा प्रभाव पडत आहे.

पर्यटकांचा ग्रामीण पद्धतीने स्वागत करताना केंद्रचालक.

गावच्या संस्कृतीमध्येही शहरी संस्कृतीची भेसळ होऊ लागली आहे. लोकांचे राहणीमन, गावातील घरे, रस्ते, गल्लीबोळ यात मोठ्या प्रमाणात बदल होत चालले आहेत. वाढत्या सोयी सुविधांमुळे गावांची वाटचाल आता निमशहरांकडे होऊ लागली आहे. पूर्वीची घरे शेणाने सारवलेली व उतरत्या छपरांची असायची. घरासमोर प्रशस्त आंगण ,तुळशी वृंदावन असायचे. लोकांचा पेहराव, वेशभूषा, केशभूषा पारंपरिक असायची; परंतु गावाकडेही शहराचे अनुकरण होऊ लागल्याने ह्या गोष्टी आता अभावाने दिसू लागल्या आहेत. म्हणजेच थोडक्यात गावाकडची संस्कृती लोप पावत चालली आहे. गावातील संस्कृतीवर शहरांचा पगडा वाढत आहे. ग्रामीण जीवनातूनही हद्दपार होत चाललेल्या संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्याचा कृषी पर्यटन एक मुख्य पर्याय आहे.

लेखिका : सुप्रिया थोरात. 

https://agrotourismvishwa.injal-vishwa-agri-and-river-camp-tourism-in-tapola/

Leave a Reply