कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय

कृषी पर्यटन केंद्र लॉजिंगला पर्याय

Alternative to agri-tourism center lodging

निसर्गाची ओढ प्रत्येकालाच असते. निसर्गात रममान होण्यास सर्वांना आवडते. निसर्गाचे सौंदर्य पाहून त्याच्या प्रेमात कुणीही पडू शकतो. असाच अनुभव कृषी पर्यटनाच्या माध्यामातून आपण घेऊ शकतो.  काळानुसार पर्यटनाचे स्वरूप बदलत आहे. ग्रामीण संस्कृती आणि शेती यांचा संगम आपण कृषी पर्यटनाच्या माध्यामातून अनुभवू शकतो. पूर्वी एका दिवसात पर्यटन करून आपण परत घरी येत असे. आता शनिवार आणि रविवार तसेच इतर सुट्ट्यांंमध्ये पर्यटक आपल्या सोईनुसार कृषी पर्यटन केंद्रावर मुक्कामी राहणे पसंत करतात. शेतात राहणे, काम करणे, पिकांचा प्रत्यक्ष स्पर्श अनुभवने यातून शहरी पर्यटकांची त्याठिकाणी रुळतात.

कृषी पर्यटन केंद्रातील राहण्याची व्यवस्था

महाराष्ट्रातील अनेक शहरात मोठ-मोठे हॉटेल्स आणि लॉजींंगची सुविधा आहेत. काही हॉटेल्समध्ये राहण्यासाठी अॉनलाईन बुकिंग करावी लागते. अथवा पूर्व नोंदणी सक्तीची असते. मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या शहरात पर्यटक लॉजमध्ये राहतात. दिवसभर पर्यटन स्थळी फिरून संध्याकाळी लॉजवर विश्रांतीसाठी येतात. कारण पर्यटनाच्या ठिकाणी त्यांना इतर कोणतेही पर्याय नसल्यामुळे लॉजमध्येच रहावे लागते. पण आता जर लॉजला पर्याय म्हणून कृषी पर्यटन केंद्राची निवड केली, तर नक्कीच हे पर्यटक कृषी पर्यटन स्थळालाच प्राधान्य देतील. निसर्गाच्या सानिध्यात तेही नयनरम्य अशा ठिकाणी कोणाला रहायला आवडत नाही. पुणे, औरंगाबाद, नागपूर, नाशिक आणि कोल्हापूर या शहरांच्या जवळ बरीच कृषी पर्यटन केंद्रे आहेत. पर्यटक आणि कृषी पर्यटक संपूर्ण जिल्हा फिरून कृषी पर्यटन केंद्रावर संध्याकाळी निसर्गरम्य परिसरात मुक्कामी राहू शकतात. मुक्कामी असलेला पर्यटक सकाळी आणि संध्याकाळी ग्रामीण संस्कृती जवळून अनुभवू शकतो. राहण्यापासून ते जेवण- खाण्यापर्यंतचे सर्व त्या कृषी पर्यटन केंद्रावर वेळेवर मिळते.

कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी बनवलेले तंबू.

औरंगाबाद शहरासह इतर शहरात विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणात फिरायला येतात. कित्येक दिवस हॉटेल मध्ये मुक्कामी राहतात. हवा आणि ध्वनी प्रदूषणाच्या विळख्यात अ़़डकलेल्या शहरातील हॉटेल्स मध्ये पर्यटक राहतात.  या पर्यटकांना जर ग्रामीण आणि शेती संस्कृतीचा अनुभव घेत कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी मनमुराद आनंद घेऊ शकतो. 2017 मध्ये 15 % विदेशी पर्यटकांची संख्या वाढली. देशाच्या पर्यटन क्षेत्रात दोन लाख खोल्यांची( रूम्स) टंचाई आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यटनमंत्री के. जे अल्फान्स यांंनी दिनांक 6-8-2018 रोजी लोकसभेत दिली. यावरून हे लक्षात येते की, दर वर्षी देशाअंतर्ग तसेच आंतराष्ट्रीय पर्यटन क्षेत्रात व्यवसाय वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी पर्यटन केंद्र लॉजला नक्कीच पर्याय ठरू शकते, याचा विचार केंद्र चालकांनी करावा. विशेषत: पर्यटन जिल्हा असलेलेल्या औरंगाबाद शहरातील कृषी पर्यटन केंद्र चालकांनी तरी. गेल्या महिन्यातच मी आणि माझे काही सहकारी, कृषी पर्यटन विश्व कंपनीच्या वतीने मराठवाड्यातील, विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यातील काही कृषी पर्यटन केंद्रांना भेट दिली, यावेळी ‘कृषी पर्यटन केंद्र’ लॉजला कसा पर्याय  ठरू शकते याविषयी तेथील कृषी पर्यटन केंद्र चालकांना आम्ही मार्गदर्शन देखील केले.

https://agrotourismvishwa.inanjanvel-agri-tourism/

Leave a Reply