महाराष्ट्रातील कृषी पर्यटन

महाराष्ट्रातील कृषी पर्यटन

Agri-tourism in Maharashtra

महाराष्ट्र राज्य सर्वार्थाने महान असे राज्य आहे. जैवविविधतेने नटलेल्या पश्चिम घाटाच्या कुशीत महाराष्ट्र राज्य  वसलेले आहे. कोकण विभाग निसर्गसंपन्न सौदर्याने नटलेला आहे. महाराष्ट्राला समुद्रकिनारा, किल्ले, शिखर, घाट, नद्या, धरणे, धबधबे, डोंगरद-या, अनेक अभयारण्य लाभले आहेत. शेती संस्कृती, संत परंपरा, तसेच मोठया प्रमाणात खाद्य संस्कृतीची परंपरा लाभली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात अनेक धर्मिक ठिकाण आहेत. अनेक नयनरम्य पर्यटन ठिकाणे आहेत. या निसर्गसंपन्न निसर्गाच्या सानिध्यात पृथ्वीतलावावरील प्रत्येक व्यक्तिला राहवे असे वाटते. निसर्गरम्य परिसरात राहण्याचा योग कृषी पर्यटन केंद्रामुळे येत आहे.  मुबंई आणि पुणे शहरांच्या आसपास कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहे. त्याच प्रमाणे नागपूर, औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांच्या ठिकाणी कृषी पर्यटन केंद्र उभे होत आहेत. महाराष्ट्राला महान इतिहास आहे. सांस्कृतिक,  शैक्षणिक, भौगोलिक, सामाजिक, राजकीय तसेच  ओद्योगिक परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.

कृषी पर्यटन केंद्रात जतन केलेल्या जुन्या ग्रामीण वस्तू

महाराष्ट्रातील God’s  own country म्हणजे कोकण प्रदेश आहे. निसर्ग देवाने कोकणात मन भरून पावले. कोकणातील निसर्ग हेच संपत्ती आहे. या कोकण विभागातील निसर्गाच्या तुलनेने थोडेच कृषी पर्यटन केंद्र आहेत. सर्वाधिक जास्त पर्यटन केंद्र पश्मिम महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त कृषी पर्यटन केंद्र आहेत. याचं कारण असा आहे की, निसर्गरम्य वातावरण, घाट, निसर्ग, जंगल, डोगर, नदी, तलाव, धरणे, किल्ले, आदिवासी संस्कृती यामुळे कृषी पर्यटनाचे महत्व वाढले आहे. पुणे आणि मुबंई शहरातील लोकांना ग्रामीण संस्कृतीचा ओढ असते. यामुळे या परिसरात कृषी पर्यटन  केंद्रांची संख्या जास्त आहेत. विदर्भ, खानदेशातही निसर्गसंपत्ती आहे. या विभातही मोठ्या प्रमाणात पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहेत. मराठवाड्यात सत्तरच्या आसपास केंद्र आहेत. मराठवाड्याला संताची भूमी म्हणून ओळखले जाते. नद्या, मोठमोठे धरणे आहेत. वेरूळ, अंजिठा, ३०० वर्षापेक्षा जास्त वर्षांची परंपरा असलेली गुरूद्वार नांदेडमध्ये आहे. मराठवाड्यााल निजामकाळ लाभल्यामुळे अनेक दर्गे, मज्जिद, उदगीर, कंधार किल्या सारखे असंख्य किल्ले मज्जिद आहेत. मराठवाड्याला मोठी संत परंपरा, वैभवशाली इतिहास लाभले आहेत.

कृषी पर्यटन केंद्रात साकारलेली वारली चित्रकला

संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास ६०० च्या आसपास कृषी पर्यटन केंद्र आहेत. यापैकी ४०० ते ५०० कृषी पर्यटन केंद्रांची नोंद खासगी आणि सहकारी तत्वावर काम करणा-या संस्थेकडे केले आहे. शंभरच्या आसपास केंद्र कुठेही केंद्रांची नोंद न करता उत्तमपणे चालवत आहेत. मार्ट आणि कृषी पर्यटन विकास महामंळ या खासगी संस्थेकडे नोंद करणे अनिवार्य नाही. देशात कृषी पर्यटन हि चळवळ सर्व प्रथम महाराष्ट्रात सुरू झाली आणि पहिले कृषी पर्यटनही महाराष्ट्रातच सुरू केली गेली. देशभरात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कृषी पर्यटन केंद्रांची संख्या वाढत आहेत. सर्वात जास्त ६०० कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात आहेत. येणाऱ्यां काळात नक्कीच मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर कृषी पर्यटन केंद्र वाढतील यात काही शंका नाही.

https://agrotourismvishwa.inagri-tourism-as-supplementary-business/

 

 

Leave a Reply