मराठवाडयातील कृषी पर्यटन

मराठवाडयातील कृषी पर्यटन

Agri-tourism in Marathwada

मराठवाडा शब्द जरी कोणी उच्चारला तर सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न पडतोे ते म्हणजे सतत पडणारा दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, पाणी टंचाई, आत्महत्या, मागास प्रदेश, गरिबी, बेरोजगार यासारखे समस्या असलेला प्रदेश. माञ मराठवाड्यात पर्यटन आणि कृषी पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर निसर्ग, नद्या, डोंगर, संत साहित्य, संतांची भूमी, निजामकाळ, हैदराबाद मुक्ती संग्राम, किल्ले, मराठवाड्यातील चालुक्य, यादव आणि सातवाहन काळ या घराण्यांचे खुणा, वास्तू, लेण्या आणि ऐतिहासिक परिस्थिती आजही या मराठवाड्यात ठळकपणे दिसते. मराठवाडा म्हंटल की संतांची भूमी आणि दुष्काळ हे एका नाण्याचे दोन बाजू पुढे येतात.

कृषी पर्यटन केंद्राचा परिसर.

सतत दुष्काळाच्या छायेत असलेला भूभाग, नैसर्गिक आपत्ती, मागास प्रदेश, आत्महत्या ग्रस्त मराठवाडा या पलीकडे जाऊन जेव्हा सकारात्मक पद्धतीने विचार करतो. तेव्हा मात्र मराठवाड्यातील मातीचं महत्व समजते. याच मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातुर, हिंगोली, परभणी, बीड, नांदेड, उस्मानाबाद आदी प्रत्येक प्रमुख शहराचा मोठा इतिहास आहे. स्थानिक कला, संस्कृती, परंपरा आहे, पैठणची जगप्रसिद्ध साडी, गुरुद्वार, जायकवाडी धरण, इतर ठिकाणांची तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहेत. तसं पाहिलं तर मराठवाडयातील शेतीची बिकट अवस्था पाहून अनेक शेतकरी कृषी पर्यटनासारखे शेतीपूरक व्यवसाय करत आहेत.

https://agrotourismvishwa.inwhat-is-agri-tourism-3/

पण म्हणावं तेवढं विकास या मराठवाडयातील कृषी पर्यटन केंद्रांचं झालं नाही आणि हे केंद्र पुढे सतत, सलग चालवलं जात नाहीत हे दुर्दैव आहे. नेहमी विविध क्षेञात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कृषी पर्यटन ही संकल्पना सर्वप्रथम स्वीकारली. आजच्या घडीला राज्याच्या विविध विभागात कृषी पर्यटन केंद्रांचे विकास होत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या केंद्राची संख्या जास्त आहे तर मराठवाड्यात खूपच कमी प्रमाणात आहेत. औरंगाबाद सोडून इतर कोणत्याही जिल्ह्याचा फारसा विकास आजही झालेला नाही. कमी औद्योगिक विकास आणि प्राथमिक व्यवसाय यावर अवलंबून असणारी कृषी संस्कृती या विभागात आहे. कृषी पर्यटन यासारखी नवखी संकल्पना अजून तरी लोकांना पुर्णपणे समजली नाही, गुंतवणूकीचा योग्य मार्गदर्शन तसेच प्रशिक्षण न मिळाल्यामुळे कृषी पर्यटन कास धरू शकली नाही. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासारखा निसर्ग सौंदर्य लाभलं नाही. असं असल तरी काळाची गरज म्हणून या भागातील शेतकरी कृषी पर्यटन केंद्र उभारत आहेत. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारत्मक गोष्ट आहे.

मराठवाड्यात काय पहायचा हा प्रश्न पडला असेल, पण कोकण आणि पश्चिम महारष्ट्रात जे निसर्ग सौंदर्य लाभलेला आहे. ते मराठवाडात आणि विदर्भात नाही मात्र पर्यटनाच्या दृष्टीने मराठवाड्यात खुप पुढे आहे. ते म्हणजे औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषीत केले आहे. याचाच फायदा कृषी पर्यटन केंद्रांना होऊ शकते. याचाच फायदा कृषी पर्यटन केंद्रांना होऊ शकते. पुणे, मुंबई आणि जगभरातून पर्यटक मराठवाड्यात येतात. आलेल्या ह्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात आणि शुद्ध वातावरणात रहावे असे वाटते. सेंद्रिय जेवणही करायचं असतेच. याचेच महत्व ओळखून कृषी केंद्रावर पर्यटकांची राहण्याची तसेच जेवण्याची उत्तम व्यवस्था करता येईल. लॉजला पर्याय म्हणून मराठवाड्यात कृषी पर्यटन केंद्र नक्कीच उभारतील. मराठवाड्यात सध्या कृषी पर्यटनच्या नावाने शेतकऱ्यांना नर्सरीचे, रोपांची लागवड, फळ झाडांचे आणि विविध खतांचे प्रशिक्षण दिले जाते. हेच सर्व पर्यटकांना दाखवले जाते. मराठवाडयातील कृषी पर्यटनाला मोठा वाव आहे. सध्या अलेल्या पर्यटनातून कृषी पर्यटनाचे विकास होऊ शकते.

लेखक : रामेश्वर गव्हाणे (पत्रकार) 

 महाराष्ट्रलेख

https://agrotourismvishwa.inagri-tourism-as-supplementary-business/

Leave a Reply