शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

शेतकऱ्यांना कृषीपर्यटनातून पैसा आणि प्रतिष्ठा

Money and prestige to farmers from agri-tourism

कृषी पर्यटन एक कृषीपूरक व्यवसाय आहे. कृषीपूरक व्यवसायातून शेती न परवडणाऱ्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळाले पाहिजे हाच मुख्य उद्देश असतो. प्रत्येक शेतकरी शेतीच्या माध्यमातून अन्न धान्यांची निर्मिती करतो. अन्नदाता म्हणून स्वाभिमानाने जगता यावे आणि शेतीतून किमान पैसा आणि प्रतिष्ठा मिळावी असे प्रत्येक शेतकऱ्याला वाटते. पण पैसा आणि प्रतिष्ठा सर्वच शेतकऱ्यांना मिळतेच असे नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी कृषी पर्यटनाचे महत्त्व ओळखून या शेतीपूरक व्यवसायाकडे आकर्षित होत आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनातून आपले नाव कमावले आहे.

शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाच्या माध्यमातून पैसा आणि प्रतिष्ठा मिळू शकते. पूर्वी शेतकऱ्यांला खूप, मान सन्मान होता. शेतकऱ्याचे उत्पन्नही जास्त होते. पण नंतरच्या काळात विविध कारणांनी शेतकरी संकटात सापडला. त्यामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला दारादरात जाऊन विकावा लागत असे. त्यातून चार पैसे मिळत असत. पण त्या चार पैशातून गरजा मात्र पूर्ण होत नसत. जागतिकीकरणामुळे बाजारपेठांमध्ये झालेला बदल शेतकऱ्यांना परवडणारा नव्हता. पण आता कृषी पर्यटनामुळे पर्यटनासाठी येणारे पर्यटक जाता जाता त्याच कृषी पर्यटन केंद्रातून सेंद्रिय पद्धत्तीने पिकवलेला ताजा माल घेवून जातात. त्यामुळे शेतकरी आपला माल शेतातच विकत आहेत. पण आता कृषी पर्यटनाच्या माध्यमातून बऱ्याच शेकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळत आहे आणि इतर शेतकऱ्यांना देखील मिळू शकते. कृषी पर्यटन हा नगदी स्वरूपाचा व्यवसाय असल्याने शेतकऱ्यांना रोख पैसा मिळतो. यातून त्यांची प्रतिष्ठाही वाढते. शहरी आणि ग्रामीण नाते संबंध चांगले होताना दिसत आहेत. गाव आणि शेतकऱ्यांविषयी प्रेम आणि आपुलकी वाढत आहे. तसेच पर्यटकांकडून चांगला मान सन्मानही मिळत आहे.

कृषी पर्यटनाच्या मध्यामतून शेतकरी आपला उधरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करू शकतो. पर्यटकांचा ग्रामीण भागाकडे आणि शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. आपल्या शेतात पाच दहा लोक येतात, राहतात, खातात, फिरतात काहीतरी खरेदी करतात. यातून शेतकऱ्याला मिळणारी आर्थिक मदत नक्कीच मोलाची असते. निसर्गरम्य वातावरण, शांतता आणि शेतकऱ्यांनी आपलेपणाने केलेला पर्यटकांचा पाहुणचार त्यामुळे पर्यटक वारंवार येण्याची शक्यता असते. पर्यटकांची राहण्याची, खाण्याची योग्य व्यवस्था शेतकरी करतात. पर्यटक कुटुंबासोबत, नातेवाईक, मित्र परिवारांसोबत येतात. पर्यटकांचे येण्याचे प्रमाण सुटीच्या दिवशी म्हणजेच शनिवार, रविवारी जास्त असते. कृषी पर्यटनामुळे शेतकऱ्यांना पैसा आणि प्रतिष्ठा मिळत आहे आणि यापुढेही मिळत राहील, यात काही शंका नाही.

https://agrotourismvishwa.intree-in-agri-tourism-part-1/

Leave a Reply