कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी

कृषी पर्यटन आणि करोनानंतरची काळजी

Agro tourism and post-coronary care

पर्यटनाचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. 2020 च्या पहिल्या तीन महिन्यात म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च मध्ये अंदाजे 22 टक्के फटका जगभरातील पर्यटन क्षेत्राला बसला आहे. या वर्षाच्या शेवट पर्यंत 40 ते 60 टक्के फटका बसण्याची शक्यता जागतिक पर्यटन संस्थेने वर्तवला आहे. जगभरात एक ते सव्वा कोटी नोक-या संकटात आहेत. 85 ते 110 कोटी आंतराष्ट्रीय पर्यटन कमी होणार असल्याचे WTO ने सांगितले आहे. UNWTO ने 2020 हे वर्ष पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास असे जाहिर केले आहे. कृषी म्हणून कृषी पर्यटन केंद्र चालवणा-या मालकांनी जास्त काळजी किंवा चिंता करू नये. शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आलेला आहे. हे ही संकटं निघून जाईल. थोडंस धीर धरा येणारा काळ हा कृषी पर्यटनाचा असेल. कृषी पर्यटनाला भविष्यात अच्छे दिन नक्की येणार आहे. 2020 हे वर्ष आपले जीवन जगण्यासाठी अथवा सांभाळव्यासाठी आहे असे विचार करूया आणि पुढे जाऊयात.   

कृषी पर्यटनात स्वच्छता आणि काळजी (Hygiene and care in agro tourism)

WTO म्हणजे जागतिक पर्यटन संस्थेने करोनानंतरचा प्रवास आणि पर्यटन संबंधी काही नियमावली नुकतीच जाहिर केली आहे. जगभरातील पर्यटना संबंधीत नियम घालून दिले आहेत. यातील काही नियम कृषी पर्यटनालाही उपयुक्त आहेत. स्वच्छता. सुरक्षितता, आदरतिथ्य, ट्रव्हल्स अँण्ड टुर एजन्सी, बैठका, कार्यक्रम इत्यादी क्षेत्रातील काम करताना पर्यटकांची आणि आपली कशी काळजी घ्यावी या संबंधीत डब्यू. टी. ओ. ने गाईड लाईन्स सांगितल्या आहेत. 

युट्यूब वर पाहण्यासठी येथे क्लिक करा.  https://www.youtube.com/watch?v=ezDukd12z0M&t=4s  

यातील काही नियम कृषी व ग्रामीण पर्यटनासाठीही लागू आहेत. ते खालील प्रमाणे.

  • किमान 8 दिवस आधी बुकिंग घ्या.
  • सध्या विदेशी पर्यटकांची बुकिंग घेवू नका.
  • वयोवृद्ध गरोदर महिला व लहान मुलांचे बुकिंग सध्या टाळा.
  • शाळा, महाविद्यालय, काँरपरेट सारख्या मोठ्या गटाचे बुकिंग रद्द करा.
  • एक दिवसीय पर्यटनाला प्राधान्य द्या.
  • कृषी व ग्रामीण पर्यटनाच्या ठिकाणी मोठे कार्यक्रम किंवा समारंभ घेऊन नका.
  • स्थानिक लोकांना पर्यटनात सामावून घ्या.
  • जिल्हाअंतर्गत पर्यटकांना प्राधान्य द्या.
  • पर्यटकांची बुकिंग घेताना आरोग्याच्या दृष्टिने सर्व चौकशी करा.
  • सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार डिजिटल स्वरूपात करा.
  • पर्यटकांचे स्वागत करतानाचं मास्क, ग्लोज आणि गरजेनुसार सॅनिटायझरचा वापर करा.
  • जेवताना, बसताना, फिरताना, बोलताना, किमान एक मीटरचा अंतर ठेवा.
  • कृषी पर्यटन केंद्रात एका एकरात किमान चार ठिकाणी सॅनिटायझर वापरासाठी ठेवा.
  • गाव फेरी, शिवार फेरी करताना कुठेही हात लावू देवू नका.  
  • स्वंयंपाकी, वाढपी, गाईड, व्यवस्थापक इतर कर्मचा-यांनी मास्क व ग्लोजचा वापर करावा.  
  • पर्यटकांची खोली, हाँल, जेवणाची जागा गरजेनुसार सॅनिटायझरने स्वच्छ करून घ्या.
  • शक्य असेल तर पर्यटकांची तपासणी तापमापन यंत्राने करा.
  • गरज भासली तर पर्यटकांची वाहने सॅनिटाईझ करा.
  • पर्यटकांची प्रतिक्रिया नोंद वहित न घेता ऑनलाईन घ्या. यातून सार्वजनिक स्पर्श टळेल.
  • आपल्या कृषी पर्यटन केंद्रात काही उत्पादने विकत असाल तर विशेष काळजी घ्या.
  • काही टुर आँपरेटरांनी सहली आणताना आरोग्य तपासणी, एक एकदिवसाय विमा काढून घ्यायला सांगा. 

वरील काही नियम व अटी कृषी व ग्रामीण पर्यटन केंद्रांना लागू होईल. यामुळे कृषी पर्यटन केंद्राना आरोग्य, स्वच्छतेच्या आणि सुरक्षितेचा दृष्टीने काळजी घेता येईल. काही नियमावलींचा पालन आपण जर नेहमीसाठी केली तर  कृषी पर्यटनावर कसलाही परिणाम होणार नाही. 

Leave a Reply