सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन

 Holiday in agri and rural tourism       

सुट्ट्या आणि कृषी व ग्रामीण पर्यटन

सध्याच्या धावपळ, तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनशैलीत निवांतपणा गरजेचा झाला आहे. कामाचा ताण-तणाव, शहरातील हवा-ध्वनी प्रदूषण यामुळे शहरात राहणाऱ्या लोकांना या शहरीकरणाचा आणि शहरी जीवनाचा कंटाळा येतो. प्रत्येक विक्केन्डला मॉलमध्ये  फिरणे, खाणे, चित्रपट पाहणे, शहरातील बागेत फिरणे, मित्र-परिवारांच्या घरी जाणे या पलीकडे आपण जास्त काही विचार  करत नाही आणि त्यासाठी वेळ पण मिळत नाही. पण तेच ते किती दिवस करणार असाही प्रश्न कधी तरी पडतो. सुटयांमध्ये कुठेही गेले तर एक-दोन दिवसात परत येणे. पुन्हा तेच ते शहरीकरणातील वातावरणात राहणं, खाणं, फिरणं, गप्पा-गोष्टी करणे हे आलंच. यातून ना पर्यटन होते ना अनुभव येतो.  त्यामुळे आठवड्याची सुट्टी शहरापासून दूर निवांत ठिकाणी घालविण्यावर भर दिला पाहिजे.  

 

 

विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटन केंद्रात शेती व ग्रामीण पर्यटनाची माहिती घेतली. 

 
वर्षभरात अनेक राष्ट्रीय दिवस, सणा- समारंभ, जयंत्या, पुण्यतीथी किंवा इतर सुट्यांमध्ये आपण प्रसिद्ध पर्यटन ठिकाणे अथवा  ऐतिहासिक स्थळी ठिकाणी फिरायला जातो. कधी शाळेतील तर कधी कॉलेजच्या मित्रांसोबत , तर कधी आपल्या इतर मित्र-परिवारासोबत आपण फिरायला जातो. अशा स्वरूपाचे पर्यटन आपण नेहमीच करतो. पण या पलीकडे पण खूप वेगळं पर्यटन करू शकतो ते म्हणजे कृषी पर्यटन होय.   
 
https://agrotourismvishwa.inbest-agri-tourism-in-pune/
 
 
सुट्ट्यांमध्ये पर्यटकांची ओढ कृषी पर्यटनाकडे 
The attraction of tourists during holidays is towards rural and agri-tourism 
 
कृषी पर्यटन ही संकल्पना नव्याने रुजू पाहत आहे.  ग्रामीण भागाची नाळ तुटलेल्या पर्यटकांना गावाकडे जाऊन निवांत राहण्याची संधी आणि शेतकऱ्यांनाही जोडधंदा मिळावा, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी कृषी पर्यटन केंद्रे सुरू झाली. शहरातील पर्यटकांना ग्रामीण भागातील माहिती जाणून घ्यायची आहे. अशा या पर्यटकांना शेतकऱ्यांनी  शनिवार रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी आपल्या शेतावर बोलावणे , ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणे कृषी संस्कृती काय आहे हे समजावून सांगणं तसेच शेतशिवाराबद्दल ग्रामीण जीवनाबद्दल तसेच खाद्यसंस्कृतीबद्दल त्यांना माहिती करून देणे ही यामागची संकल्पना आहे  आणि यातून शेतकऱ्यांनाही  मोबदला मिळतो. म्हणून हा शेतीपूरक व्यवसाय सध्या वाढत आहे.  
 
कृषी पर्यटन हे कृषिरंजन व कृषी शिक्षणाचे महत्वाचे ठिकाण
Agri-tourism is an important destination for agritainment and agri-education
 सुट्ट्यांमध्ये आपणाला  जर भन्नाट असे कृषीरंजन आणि कृषी शिक्षण घ्यायचं असेल किंवा अनुभवात्मक पर्यटन करायचं असले तर कृषी व ग्रामीण पर्यटन हा एक उत्तम पर्याय आहे. या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळालेल्या सुट्यांचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. कृषी पर्यटन केंद्र म्हणजे शेती आणि ग्रामीण संस्कृतीचा संगम आहे.  शहरी लोकांना ग्रामीण जीवनाची, संस्कृतीची ओळख  होते. तसेच यातून शहरी पर्यटकाना शांत, निसर्गसंपन्न ठिकाणी राहून पर्यटनाचा आनंद मिळतो. 
 

Leave a Reply