कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची व्यवस्था

Accommodation at Agro tourism Center

संपूर्ण जग निसर्गाकडे जात आहे. आपण निसर्गाच्या जवळ जात आहे. निसर्गाचे महत्व जाणून त्यावर प्रेम करत त्याच्याशी निसर्गाशी एकरूप होत आहोत. त्याची अनेक कारणे आणि फायदेही आहेत. कारण धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातून कुठे तरी निवांत निसर्गाच्या सानिध्यात राहायला कोणला आवडणार नाही. सिमेंटच्या जंगलात राहणारे शहरी पर्यटक कृषी पर्यटन केंद्रात राहायला येतात तेव्हा त्यांना कृषी प्रयत्न केंद्रातील गवताचे, मातीचे आणि शेणाने सारवलेले घर (कुटी) स्वर्गाहून सुंदर वाटते.

कृषी पर्यटन केंद्रात पर्यटकांच्या राहण्यासाठी केलेली व्यवस्था.

कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृती ,जीवन आणि राहणीमान यांचे जतन केले जात आहे. निवासस्थानी पारंपरिक पध्दतीचे खाट, खुर्च्या, लाकडी वस्तू, लाकडी आलमारी, कपाट काही कृषी केंद्रात बसण्यासाठी खुर्च्या, जेवण्यासाठी टेबल, झोपण्यासाठी बाज बांबूपासून बनवलेल्या असतात. कुटीत उन्हाळ्यात गारपणा वाटतो.

https://agrotourismvishwa.inhistory-of-agri-tourism-india/ 

पर्यटकांच्या पसंतीनुसार त्यांना राहण्यासाठी सोय करून दिले जाते. काही पर्यटकाना तंबूत झोपायला आवडते. तर काहींना मोकळ्या अंगणात, लाकडी घरात तर बांबू घरात, लाकडी बाजावर झोपायला आवडते. तर काही पर्यटक खोलीमध्येच झोपतात. काही केंद्रात रात्री पहारासाठी कुत्रे पाळलेले असतात . यापासून पर्यटकांची सुरक्षा होते. पर्यटकांना राहण्याची व्यवस्थेमुळे कृषी पर्यटन केंद्राला चांगली आर्थिक मदत मिळते. या परिसरात पर्यटकांच्या आवडीनुसार राहण्यासाठी सोय आहे. काही पर्यटन केंद्रात झाडावर मचाण बांधले आहेत. पाचणीच्या सह्याने मचाण बांधले जाते. अशा ठिकाणी पर्यटक राहण्याचे मागणी करत असल्याचे कृषी पर्यटन केंद्र प्रमुख सांगतात. उन्हाळ्यात मचाणवर राहण्यासाठी पर्यटक पसंद करतात. पर्यटकांच्या मागणीनुसार उपलब्ध जागेवर मचाण बांधण्याचे विचार पर्यटन केंद्र करू शकतात.

कृषी पर्यटन केंद्रात राहण्यासाठी बनवलेली कुटी.

पर्यटकांचे राहण्याचे ठिकाण सुरक्षितदृष्या काळजी केंद्राने घेतले पाहिजे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, झोपण्यासाठी लागणारे साहित्य, परिसरात जास्त थंडी असेल तर पांघरणाची व्यवस्था केले जाते. पर्यटकांना राहण्याच्या दृष्टीने स्वच्छतागृह, स्नानगृहाचे व्यवस्था केली पाहिजे. सुरक्षित आणि पर्यटकांना एकांत मिळावे हे कृषी पर्यटनाचे उद्दिष्ट मानले जात आहे.

https://youtu.be/Fjp2_gEwqUs


आधुनिक माणसाची आपल्या संस्कृतीशी आणि मातीशी तुटलेली नाळ जोडण्याचा सफल प्रयत्न पराशर कृषी पर्यटन केंद्रात आपल्याला पाहायला व अनुभवण्यास मिळेल. या ठिकाणी निसर्गाचा समतोल राखत टाकाऊ पासून टिकाऊ व लाभदायक तसेच आरोग्यदायी पद्धतीने उभारलेली कुटी आपल्याला एक वेगळीच राहण्याची अनुभूती देते. सांजवेळी अल्ल्हादायक वातावरण पाखरांची किलबिल तसेच सूर्य किरणांनी जणू चौफेर सोन्याचीच उधळण केली आहे असा भास होतो ….. या ठिकाणी शेणाने सारवलेली जमीन थकलेल्या देहाला जणू आपल्या मायेचा पदर ओढून कुशीत घेते व आराम या शब्दाचा खरा अर्थ समजावते.

 

Leave a Reply