पराशर कृषी पर्यटन – यशोगाथा

पराशर कृषी पर्यटन – यशोगाथा

Parashar Agri Tourism – Success Story

धावपळीच्या व तणावपूर्ण जिवनातून काही घटका उसंत मिळवण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात पर्यटनाला पसंती देवू लागले आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील विविध घटकांना/प्रकारांना सोनेरी दिवस आलेले आहेत. दैनंदिन जिवनाच्या चाकोरीबाहेर जावून जरा बदल म्हणून तसेच स्थानिक माती व संस्कृतीशी जोडले जावे म्हणून लोक कृषी पर्यटनाकडे आकर्षित होवू लागले आहेत. शहरी लोकांना ग्रामीण जिवनाची अनुभुती करून देण्याच, ग्रामीण संस्कृतीशी त्यांची नाळ जोडण्याचे काम नव्याने उदयाला आलेले पर्यटन क्षेत्र म्हणजेच कृषी पर्यटन केंद्र बजावत आहे. ह्याच गोष्टींना अनुसरून पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हाडवळे दाम्पत्याने पराशर कृषी पर्यटन केंद्र उभारले आहे. अवघ्या एक एकर उंच-सखल पडीक जागेमध्ये कृषी पर्यटन केंद्र उभारून नंदनवन साकारले आहे.

 

https://www.youtube.com/watch?v=EfbIVE03Gdg

मनोज हाडवळे यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपली आहे. केंद्राच्या माध्यमातून परिसरातील इतर शेतकऱ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. इतर शेतकऱ्यांच्या मदतीने शेत-शिवार फेरफटका, बैलगाडी ट्रॅक्टर ट्रॉलीची सफर घडवली जाते. रात्रीच्या तमाशात जागरण-गोंधळाचा कार्यक्रम दाखवला जातो. तसेच स्थानिक बचतगटांच्या वस्तूही विक्रीला ठेवल्या जातात. पर्यटकांना भेटवस्तू म्हणून गावच्या कुंभाराने बनविलेली बैलजोडी भेट म्हणून दिली जाते. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन केले जाते. आलेल्या पर्यटकांना गावाचे गावपण आणि संस्कृतीचे दर्शन घडविणे जाते. भारतात आदिवासी संस्कृतीला खूप महत्व आहे. या समाजाचे वारली कलेच अनुभव इथं घेता येते. मातीपासून विविध प्राणी, पक्षी आणि वस्तू बनविले जाते. या मातीच्या गोळापासून पर्यटकही मातीशी जोडले जातात. या मातीशी जवळ आणण्याचे काम नम्रता हाडवळे करतात. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन एक उत्तम उदाहरण म्हणून नावारूपाल येत आहे. आज अनेक शेतकरी या व्यवसायाकडे आशेन पाहत आहेत. अशा शेतर्यांना देखील मार्गदर्शन करतात. अत्यंत कमी जागेत नियोजनबद्ध पद्धतीने केंद्राची रचना केली आहे. थोडक्यात पराशर कृषी केंद्र हे ‘कम्युनिटी टुरिझम’ मॉडेलच उत्तम उदाहरण आहे. संस्कृतीसोबतच केंद्रात पर्यटकांना वारली पेंटिंग, मातीच्या वस्तू बनवणे यांसारख्या गोष्टीचे प्रात्याक्षिक दिले जाते.

https://www.youtube.com/watch?v=Fjp2_gEwqUs

जुन्नर तालुका निसर्ग सौंदर्याने पुरेपुर संपन्न असल्याने पर्यटकांना इतर पर्यटन ठिकाणेही दाखवली जातात. उदा.शिवनेरी, लेण्याद्री, ओझर, जीएमआरटी केंद्र. या पर्यटन केंद्राला कृषी पर्यटन गौरव पुरस्कारासोबत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आऊटलुक ट्राव्हलरने दहा ग्रामीण पर्यटनांची यादी तयार केली. त्यात पराशर कृषी पर्यटन केंद्र प्रथम स्थानावर होते. केंद्राचे संचालक मनोज हाडवळे इतर शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळाही आयोजित करतात. यातून इतर भागात कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळते. या कार्यशाळेत जागेच्या निवडीपासून ते केंद्र उभारणीवर येणारा संभाव्य खर्च याची तपशिलवार माहिती दिली जाते. निवांतपणाचे क्षण अनुभवण्यासाठी निसर्गाचा व मातीचा सहवास अनुभवण्यासाठी हे केंद्र एक उत्तम ठिकाण आहे. या ठिकाणाला भेट दिल्यावर मनाला खूप ताजतवान वाटत. निसर्गाचं नेत्रसुख अनुभवण्यासाठी या केंद्राला नक्कीच भेट द्या.

लेखिका : सुप्रिया थोरात. 

https://agrotourismvishwa.inconservation-promotion-of-rural-culture-through-agricultural-tourism-part-2/

Leave a Reply