कृषी पर्यटन म्हणजे काय ?

कृषी पर्यटन म्हणजे काय ?

What is agro tourism ?

कृषी पर्यटन म्हणजे प्रत्यक्षात शेती कशी केली जाते. शेती कसे पिकवतात. शेतात कोण कोणती पीक कधी येतात. शेतीची लागवड कधी आणि कशी केली जाते. एकंदरीत ग्रामीण भागातील शेती विषयक सर्व उपक्रम आणि कार्य जे शेतात चालतात आणि हे सर्व शहरी लोकांना वाचून किंवा एकुण माहिती असते. पण प्रत्यक्षात शेतात जाऊन ते पाहणे, अनुभवणे, स्वत: शेतात काम करणे आणि खऱ्या अर्थाने अनुभव घेऊन, ग्रामीण जीवन जगण्याचा पर्याय कृषी पर्यटनाच्या माध्यामातून ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष स्व: अनुभव घेणे म्हणजे “कृषी पर्यटन होय. ग्रामीण भागातील शांत वातावरण, शुध्द हवा, निसर्गरम्य परिसर, कला, संकृती, वेशभुषा, खाद्यसंकृती तसेच गावात मिळणारे दुर्मिळ वनस्पती, झाडे, प्राणी, पक्षी, झरे, डोंगर, दऱ्या, निसर्ग निरीक्षण, शिवार शेतीचा अनुभव घेणे. शहरी लोकांनी चार दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन राहणे व शेतकर्‍यांने शहरी लोकांचा सशुल्क स्वागत करणे. 

 

कृषी पर्यटन म्हणजे शेतात फेरफटका मारणे, आपल्या संस्कृतीची ओळख करून घेणे, शहरी जीवनशैलीचा कंटाळा आलेल्या लोकांना कृषी पर्यटन हा पर्यटनाचा नवीन चेहरा. कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास या ब्रीद वाक्याला साजेसे कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात सुरू झाले आहेत. पण संपुर्ण महाराष्ट्राला परिचीत नाही. महाराष्ट्राचा विशेष ग्रामीण भागाचा विकास कृषी पर्यटनाच्या माध्यमातून सहज शक्य  आहे. आणि ते होताना दिसत आहे. शेती व्यवसाला कृषी पर्यटनाचा जोड देऊन उत्पादनांत भर घालता येणारा प्रकल्प म्हणजे ‘कृषी पर्यटन’ होय.

https://agrotourismvishwa.inrural-agro-tourism-and-holiday/

कृषी पर्यटन म्हणजे शेतावर येणं, रहाणं. शेतातील पीकपाण्याची माहिती घेणं वाटल्यास सोपीसोपी शेतकामं स्वत: करून पहाणं. शेतक-यांचं शेत जीवन अनुभवणं ग्रामीण संस्कृती समजून घेणं होय. आजही शेकडो शहरी लोकांची नाळ शेतीशी जुळलेली आहे. कधीकाळी आपले गाव सोडून कामधंद्यासाठी शहरात आलेले इथेच राहिले. सणा-वाराला, लग्नकाऱ्याला गावाकडे जाणं होतं परंतू कामाच्या व्यापात गावात निवांत रहायाला मिळत नाही. निवांत मनसोक्त वेळ काढून राहता येत नाही. मोठयांची अशी अवस्था तर त्यांच्या मुलाबाळांची नाळच गावापासून तुटली. मुलांनी आपलं आजोळ पाहिलं पण अनुभवलं नाही. शेतंही पाहिली असेल, परंतू हुंदडता फिरता आलं नाही. ज्यांना गावात जाता येता येते त्यांची अशी अवस्था तर ज्यांना मुळात शेती नाही त्यांची मानसिकता कशी असेल? गाव म्हणजे  एेकण्यापुरता, वाचण्यापुरता असेल, हे प्रत्यक्ष अनुभवू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी “कृषी पर्यटन” हा एक उत्तम पर्याय समोर आलेला आहे.

 

शेतात किंवा ग्रामीण भागात जाऊन विविध पक्ष्याचे आवाज एेकणे, फुलांची वैविध्यता अनुभवने, फळांची चव चाकणे, बैलगाडीतून फेरफटका, म्हैस किंवा गाईचे दूध पारंपरिक पद्धतीने काढणे. विहरीत पोहणे, ट्रेकिंग करणे, शिवार फेरी, शेतात फेरफटका मारणे, गावातील सण, उत्सव, परंपरा, गावांची वेगळेपण, गावाची संस्कृती पाहणे, ग्रामीण भागातील वेगवेगळे कारागीरांचा कला पाहता येते.  उदा: वाद्य कलाकार, बांबूपासुन टोपली विणणे, सुप, झाडू तयार करणे, लाकडापासुन तयार केलेले वस्तु पाहता येते. विकत पण घेऊ शकतो. एकंदरीत शहरीकरणाचा विट आलेल्यांनी ग्रामीण भागात जाण्याचा विचार करत असेल तर पण, कुठे रहायचं, काय खायचं, काय करायचं काय पहायचं याची काळजी कृषी पर्यटन केंद्र घेत आहेत.

https://agrotourismvishwa.inwho-and-how-start-agri-rural-and-farm-tourism/

Leave a Reply