When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
कृषी पर्यटन कसे आणि कोण सुरू करू शकतो ?
आजकाल लोक पर्यटनाबाबत खूपच जागरूक होत आहेत. लोकांना पर्यटनासाठी वेगवेगळे प्रकार खुणावत असतात. याच गोष्टीचा फायदा ग्रामीण पर्यटनाने उचलला पाहिजे. कारण आजही शहरांपेक्षा ग्रामीण भागातील पर्यटन उपेक्षितच आहे. ग्रामीण पर्यटनाचा हवा तेवढा प्रचार व प्रसार झालेला नाही. ग्रामीण पर्यटनाला वाव देण्यासाठी कृषी पर्यटनाला चालना देणे गरजेचे आहे. शेती , गाव , शेतकरी,पर्यटक , परिसराचा इतिहास व भूगोल , पर्यावरण हे कृषी पर्यटनासाठी आवश्यक असणारे महत्वाचे घटक आहेत. कोरोनामुळे अनेक लोक गावी गेले आहेत. गावाकडेही आर्थिक स्रोतांवर मर्यादा आहेत. केवळ शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा त्याला जोडधंदा म्हणून जर कृषी पर्यटन केंद्र सुरु केले तर आपल्याबरोबरच इतर स्थानिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
कृषी पर्यटन केंद्रातील हिरवळ
स्वतःची जमीन असणारा शेतकरी कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो. शेतकरी पर्यटन केंद्र चालविणारी व्यक्ती शेती करणारी असावी. तसेच ही शेती त्याच्या स्वत:च्या अथवा त्याच्या कुटुंबातील सदस्याच्या नावे असणे आवश्यक आहे. अगदी एक एकर जागेतही कृषी पर्यटन उभारता येते. याशिवाय चार-पाच शेतकरी एकत्र येऊनही सामुहिक कृषी पर्यटन उभारता येऊ शकते. कृषी क्षेत्र कमी आकाराचे असल्यास आसपासच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कृषी संबंधित बाबी संबंधित शेतकऱ्याच्या सहमतीने पर्यटकांना दाखविता येतील.
शेतकऱ्यांच्या कृषी सहकारी संस्था : (Agricultural Cooperative Society)
सहकाराचा सर्वात जास्त विस्तार कृषी क्षेत्रात झाला आहे. कृषी सहकारी संस्था देखील कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतात. कृषी सहकारी संस्थामार्फत व्यावसायिक तत्वावर कृषी पर्यटन केंद्र सामुदायिकपणे सुरु करता येऊ शकते.
राज्यातील कृषी विज्ञान केंद्र कृषी पर्यटन सुरू करू शकतात. (KVK Can be a Great Agri-Tourism hub)
प्रत्येक जिल्ह्यात साधारणपणे एक किंवा त्यापेक्षा अधिक कृषी विज्ञान केंद्रे असतात. कृषी विज्ञान केंद्रांद्वारे शेतकरी व कृषी उद्योजकांना मार्गदर्शन केले जाते. कृषी विज्ञान केंद्र एक उपक्रम म्हणून कृषी पर्यटन विकसित करू शकते.
कृषी महाविद्यालये/ कृषी विद्यापीठे : (Agricultural Colleges / Agricultural Universities)
सेंद्रिय शेती करणारा शेतकरी : (Organic Farming Farmer Should be Start Agro Tourism Center )
रायासनिक शेतीमुळे लोकांच्या आरोग्यावर आणि शेतीवरही विपरीत परिणाम होत आहेत. त्यामुळे सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता वाढत आहे. सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरणात सेंद्रिय शेती करणारा शेतकरी देखील कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो याला मान्यता देण्यात आली आहे.
कोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी : (Agricultural Business)
केवळ शेती करणारच नाहीतर कोणतेही शेतीपूरक व्यवसाय करणारा शेतकरी देखील कृषी पर्यटन केंद्र सुरु करू शकतो. जेणेकरून पर्यटकांना केवळ शेतीच नाहीतर शेतीपूरक व्यवसायांची देखील ओळख व्हावी.याशिवाय उत्साही व्यक्ती, आवड असणारा, गावावर प्रेम करणारा, गावाचा इतिहास, भूगोल, पर्यायवरण आणि पर्यटनाविषयी जाण असणारा व्यक्ती कृषी व ग्रामीण पर्यटन करू शकतो.
कृषी पर्यटन केंद्राचा परिसर
कृषी पर्यटन केंद्र कसे विकसित करावे – (How to Develop Agro-Tourism Center)
कृषी पर्यटन केंद्रचालक टप्याटप्याने काम करत कृषी पर्यटन केंद्र विकसित करू शकतो.
१) शेतीचे / जमीन सपाटीकरण करणे : (Leveling the Land is the First Step of Agri Tourism Center )
कृषी पर्यटन केंद्र अगदी उंच-सखल जागेमध्ये सपाटीकरण करून सुरु करता येते. केंद्रासाठी निवडलेली जागा जर उंच-सखल असेल तर सर्वात आधी जमिनीचे सपाटीकरण करावे. जमिनीचे सपाटीकरण झाल्यानंतर त्यामध्ये झाडे लागवड , बांधकाम सुरु करावे.
https://agrotourismvishwa.inanniversary-of-parashar-agri-tourism/
२) देशी झाडं लावणे : (Planting of Desi Trees in Agro Tourism)
ग्रामीण भागातील पडीक, गायरान आणि क्षारपड जमिनी उपयोगात आणणे, हा कृषी पर्यटनाचा उद्देश आहे. त्यासाठी जमीन उपयोगाखाली आणण्यासाठी विविध प्रकारची झाडे लावणे गरजेचे आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती , फुलझाडे , पिके , रानभाज्या , फळझाडे , मोठे वृक्ष असे वर्गीकरण करून झाडे लावू शकता. तसेच पर्यटन केंद्राच्या ठिकाणी एकाच वेळी विविध पीक पध्दतींचा अवलंब करावा जेणेकरून पर्यटकांना शेतीतील विविधतेचा अनुभव घेता येईल.
३) कृषी पर्यटन केंद्राची सिमारेषा आखून घेणे : (To Draw the Boundaries of Agri-Tourism Center)
कृषी पर्यटन केंद्र हे शांत, सुंदर, निसर्गरम्य अशा ठिकाणी असावे. कृषी पर्यटन केंद्रांतर्गत राहण्याकरिता उभारण्यात येणाऱ्या खोल्या शक्यतो पर्यावरणपूरक असाव्यात. खोली, रूम्स् आणि टेन्ट अशा स्वरूपात स्टे टुरिझमला सुरुवात करू शकतो.
६) पर्यटकांसाठी वेगवेगळे उपक्रम घेणे : (Taking various activities for tourists in Rural and Agri Tourism)
८) सुरूवातीला समाज माध्यमांचा वापर करून मार्केटिंग करणे : (Agro Tourism Marketing using social media)
When things can be returned or exchanged (like 30,60 or 90 days past purchase date)
Once an agreement is entered into between your Agro tourism project and Agri Tourism Vishwa, there will be no change.
Agro tourism Vishwa respects your privacy and recognizes the need to protect the personally identifiable information (any information by which you can be identified, such as name, address and telephone number) you share with us.
Contact Us 9730023946
agrotourismvishwa@gmail.com
info@agrotourismvishwa.in
Address Agro Tourism Vishwa,
Rachna Avenue, Good Luck Chouk,
Ferguson College Rd,
Shivajinagar, Pune- 411004
Leave a Reply
You must be logged in to post a comment.