16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम

16 मे जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्रातील विविध कार्यक्रम

Various programs in Maharashtra on the occasion of 16th May World Agri-Tourism Day

दर वर्षी प्रमाणे यंदाही महाराष्ट्र राज्य कृषी ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ (मार्ट), कृषी पर्यटन विकास संस्था तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने दर वर्षी १६ मे ला जागतिक कृषी पर्यटन दिवस साजर केला जातो. या दिवशी महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्र चालवणा-या शेतक-यांना कृषी पर्यटन गौरव पुरस्कार, शेतक-यांचा सन्मान, आत्महत्या शेतक-यांना आर्थिक मदत, महाराष्ट्रातील उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांना पुस्कार  दिला जातो. मार्टचे यंदाचा १0 वे, तर कृषी पर्यटन विकास संस्थेचे ११ वे वर्ष आहे. हे दोन्ही खासगी संस्था आहे. राज्यातील कृषी व ग्रामीण पर्यटनातील शिखर संस्था मार्टच्या वतीने जागतिक कृषीपर्यटन दिनानिमित्ताने १६ मे रोजी कृषीपर्यटन परिषद दुपारी ३ वाजता बालगंधर्व येथे पार पडणार आहे. कृषी पर्यटन दिनानिमित्ताने शेतक-यांना कृषी पर्यटन गौरव सोहळा २०१८. शेतकरी गीतांनी रंगणार असल्याचे माहिती मार्टचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी सांगितेल. यंदाच्या वर्षी विशेष पुरस्कार पाणी या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेस पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी अभिनेते मकरंद अनासपुरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात शेतकरी आपल्या कृषी पर्यटन केंद्रांचे यशोगाथा सांगणार आहेत. तरी या समारंभास उपस्थित राहून कृषीपर्यटन चळवळीस सक्रिय सहभाग घ्यावे असे अावाहन मार्टने केले आहे. पुणे, यवतमाळ, रत्नागिरी, अहमनगर आणि सातारा या जिल्हातील कृषी पर्यटन केंद्र चालवणा-या शेतक-यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कृषी पर्यटन विकास संस्था तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या वतीने दिनांक १६ मे जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून शेती उत्पन्न कसा जास्त वाढवता येईल या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. हे परिषद यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई , मंत्रालय समोर १६ मे ला सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.  महाराष्ट्रातल्या उत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्रांना मा.कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर व मा.पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे. कृषी पर्यटन गौरव पुरस्कारासाठी देशातील विविध कृषी पर्यटन केंद्र चालकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. या प्रसंगी मा पर्यटन राज्य मंत्री, मा. कृषि राज्यमंत्री, तसेच पर्यटन सचिव, कृषी सचिव, व इंडिया टुरिझमच्या विभागीय संचालिका उपस्थित असतील, या परिषदेला देशभरातील कृषी पर्यटन तज्ज्ञ उपस्थित राहणार आसल्याची माहिती कृषी पर्यटन तज्ज्ञ पांडुरंग तावरे यांनी  सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

https://agrotourismvishwa.inagro-tourism-is-a-place-of-study/

Leave a Reply